Maharashtra First Case of Zika Virus | महाराष्ट्रात आढळला खतरनाक झिका विषाणूचा पहिला रुग्ण
महाराष्ट्रात उडाली मोठी खळबळ
जामखेड टाईम्स वृत्तसेवा : महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत नाही तोच आता महाराष्ट्राची डोकेदुखी वाढवणारी एक बातमी पुणे जिल्ह्यातून समोर आल्याने महाराष्ट्रात मोठी खळबळ उडाली आहे. पुणे जिल्ह्यात धोकादायक झिका विषाणूचा रुग्ण आढळून आल्याने आरोग्य विभागाची यंत्रणा चक्रावून गेली आहे. Maharashtra First Case Of Zika Virus
याबाबत सविस्तर असे कि, केरळमध्ये आढळणाऱ्या झिका विषाणुची लागण (Maharashtra First Case Of Zika Virus) झालेला राज्यातील पहिला रुग्ण पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील बेलसर गावात आढळला आहे. (Belsar Purandar Taluka in Pune District) त्यामुळे आरोग्य विभागात एकच खळबळ उडाली आहे. एका ५० वर्षीय महिलेला झिका विषाणुची लागण झाल्याची माहिती पुणे जिल्हा परिषद प्रशासनाने शनिवारी दिली आहे. (Maharashtra Reports First Case Of Zika Virus Woman in Pune Tests Positive)
पुणे जिल्ह्यातील बेलसर गावात झिका विषाणूचा रुग्ण आढळल्यामुळे परिसरातील पाच किलोमीटर मधील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सध्या स्थितीला हवामान हवामान बदलामुळे डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया त्याचबरोबर इतर साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. Maharashtra First Case Of Zika Virus
बेलसरमध्ये मागील एक ते दिड महिन्यापासून डेंग्यू चिकनगुनिया आणि इतर साथीच्या रोगांनी थैमान घातले होते. त्याच अनुषंगाने एनआयव्ही (National Institute of Virology) पुणे बेलसर (ता.पुरंदर) मधील ५१ नमुने गोळा करून ते तपासणीसाठी घेतले होते. त्यामध्ये प्रमुख्याने झिका विषाणूचा एक रुग्ण असल्याचा अहवाल एनआयव्ही शुक्रवारी राज्य शासनाला कळवले. तसेच २५ चिकनगुनियाचे तर ०३ डेग्यू चे रुग्ण आढळून आले आहेत.Maharashtra First Case Of Zika Virus
राज्य शासनाने जिल्हा परिषद प्रशासनाला बेलसर गावात उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार जिल्हा परिषदेचे मुख्यकार्याकारी अधिकारी आयुष प्रसाद, राज्य साथरोग प्रमुख डाॅ. प्रदीप आवटे, जिल्हा आरोग्य अधिकारी भगवान पवार यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांनी भेट दिली आहे.Maharashtra First Case Of Zika Virus