Serious allegations of Rs 1000 crore scam against BJP MLA Suresh Dhas । भाजपा आमदार सुरेश धसांवर एक हजार कोटींच्या घोटाळ्याचा गंभीर आरोप; राजकीय वर्तुळात उडाली खळबळ; धस आले अडचणीत ?
जामखेड टाईम्स वृत्तसेवा :Serious allegations of Rs 1000 crore scam against BJP MLA Suresh Dhas । राज्यात भाजपच्या नेत्यांकडून महाविकास आघाडीच्या मंत्र्यांवर भष्ट्राचाराचे आरोप सातत्याने होत आहेत. ईडी आणि इन्कम टॅक्स विभागाकडून राज्यात गेल्या दिवसांपासून धाडसत्र सुरू आहे. या कारवायांमुळे सत्ताधारी गटातील अनेक नेते अडचणीत सापडले आहेत. अश्यातच बुधवारी भाजपच्या आमदाराला अडचणीत आणणारी मोठी बातमी समोर आली आहे.
बीड जिल्ह्यातील भाजपचे विधानपरिषदेचे आमदार सुरेश धस (MLA Suresh Dhas) यांच्यावर सुमारे एक हजार कोटींचा घोटाळा केल्याचा खळबळजनक आरोप ॲड असीम सरोदे (Ad Asim Sarode) यांनी केल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
आमदार सुरेश धस यांनी आष्टी तालुक्यातील आणि परिसरातील वक्फ बोर्ड आणि देवस्थान ट्रस्टच्या सुमारे 450 एकर जमीनी बळकावत एक हजार कोटींचा गैरव्यवहार केल्याचा सनसनाटी आरोप करण्यात आला आहे. बुधवारी ॲड असीम सरोदे (Ad Asim Sarode Aaurangabad ) यांनी औरंगाबादेत पत्रकार परिषद घेत खळबळ उडवून दिली.(Serious allegations of Rs 1,000 crore scam against BJP MLA Suresh Dhas)
आरटीआय कार्यकर्ते राम खाडे आणि अब्दूल गणी यांनी या घोटाळ्याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. त्याची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सरोदे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केली. तसेच या प्रकरणाची रितसर तक्रार बीड आणि औरंगाबाद येथील लाचलुचपत विभागाकडे करण्यात आली आहे. ईडीकडेही वेगळी तक्रार दाखल केली जाणार असल्याचे सरोदे यांनी स्पष्ट केले.
वर्ग 2 च्या इनामी जमिनी हडपण्यामागे भ्रष्टाचाराची मोठी साखळी आष्टी तालुक्यात कार्यरत असल्याचा आरोप करत सरोदे पुढे म्हणाले की, सेवा कार्यासाठीच्या वक्फ बोर्ड आणि मंदिर ट्रस्ट यांच्या इनामी जमिनीवर सुरूवातीला दुसर्यांची नावे चढवायची त्यानंतर आपल्या मर्जीतील लोकांना त्या जमिनी विकत घ्यायला लावायच्या. ज्यांची पात्रता नाहीत अश्यांनी या जमिनी विकत घेतल्या आहेत. यासाठी आमदार धस यांच्या ताब्यातील मच्छिंद्र मल्टिस्टेट सोसायटीकडे करोडो रुपये देण्यात आल्याचा गंभीर आरोप यावेळी सरोदे यांनी केला.
तसेच इनामी जमिनी आणि देवस्थान जमिनी बळकावण्यासाठी चुकीची आणि खोटे कागदपत्रे पुरवून खोटे रेकॉर्ड बनवण्यात आले. त्यानंतर या जमिनी धस यांच्या ताब्यात येत असा गंभीर आरोप करत या गैरव्यवहारात आमदार सुरेश धस, त्यांचे नातेवाईक आणि कार्यकर्त्यांचा समावेश असल्याचा गंभीर आरोप ॲड असीम सरोदे यांनी केला आहे.
राजकीय वर्तुळात काय प्रतिक्रिया उमटणार?
आमदार सुरेश धस यांच्यावर सुमारे एक हजार कोटींच्या घोटाळ्याचे आरोप झाल्याने आष्टीसह बीड जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. धस यांच्यावर झालेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर सरकार काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच या संपुर्ण प्रकरणावर राजकीय वर्तुळात काय प्रतिक्रिया उमटणार याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.
आमदार सुरेश धस काय बोलणार ?
दरम्यान ॲड असीम सरोदे यांनी केलेल्या गंभीर आरोपांवर आमदार सुरेश धस यांची प्रतिक्रिया अजून तरी समोर आलेली नाही. या संपुर्ण प्रकरणावर आमदार सुरेश धस काय बोलणार? याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.