Narmada bus accident live updates : नर्मदा बस दुर्घटना, नर्मदा नदीत एसटी बस कोसळूून 13 जण ठार, महाराष्ट्र सरकारकडून 10 लाख रुपयांच्या मदतीची घोषणा
Narmada bus accident live updates : मध्यप्रदेश : मध्यप्रदेशात एस टी महामंडळाची बस पुलावरून नर्मदा नदीत कोसळून भीषण अपघात झाला आहे. या अपघातात आत्तापर्यंत 13 जणांचा मृत्यू झाला असून 15 जणांना वाचवण्यात यश आले आहे. (ST bus falls into Narmada river 13 killed, Chief Minister Eknath Shinde announces Rs 10 lakh aid,
या बस मध्ये 50 ते 55 प्रवासी असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे अद्याप 25 जण बेपत्ता आहेत. बसमधील प्रवाशांमध्ये 13 लहान मुलांचा समावेश होता. स्थानिक प्रशासनाद्वारे बचावकार्य सुरु आहे. मध्यप्रदेशातील खलघाट आणि ठीगरी येथे असणाऱ्या नर्मदा नदीवरील पुलाचा कठडा तोडून ही बस नदीत कोसळली.
अपघातग्रस्त बसचा क्रमांक MH 40 N 9848 असा आहे. चंद्रकांत एकनाथ पाटील 18603 हे या बसचे चालक होते. तर प्रकाश श्रावण चौधरी 8755 हे या बसचे वाहक होते. सदर अपघातासंदर्भात माहिती मिळवण्यासाठी एसटी महामंडळाच्या वतीने 022/23023940 हा हेल्पलाईन नंबर जारी करण्यात आला आहे.
एस टी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी माहिती दिली की अपघातग्रस्त बस ही जळगाव जिल्ह्यातील एस टी महामंडळाची बस आहे. सकाळी 7:30 वाजता ही बस इंदूर येथून निघाली होती. अमळनेर येथे येत असताना मध्य प्रदेशातील धार येथे नर्मदा नदीच्या पुलावरून ही बस थेट नदीत कोसळली.
धार जिल्हा प्रशासनाचे घटनास्थळी बचावकार्य सुरु आहे. या अपघातात आत्तापर्यंत 13 जणांचे मृतदेह हाती लागले आहेत. एस टी महामंडळाचे अधिकारी तातडीने घटनास्थळी रवाना झाले आहेत असे चन्ने म्हणाले.
नर्मदा दुर्घटना : मृतांच्या नातेवाईकांना 10 लाखांच्या मदतीची मुख्यमंत्र्यांची घोषणा
मध्य प्रदेशातील नर्मदा नदीमध्ये आज बस बुडून झालेल्या अपघातात मरण पावलेल्या प्रवाशांच्या नातेवाईकांना एसटी तर्फे प्रत्येकी दहा लाख रुपये देण्याची कार्यवाही लगेच करावी असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एस टी महामंडळाला दिले आहेत.
या दुर्दैवी घटनेबद्दल राजकीय वर्तुळातून प्रतिक्रीया येऊ लागल्या आहेत. सर्वच नेत्यांनी या घटनेबद्दल दु:ख व्यक्त करत श्रध्दांजली अर्पण केली आहे.