Shaifek from Sambhaji Brigade on senior journalist Girish Kuber | नाशिक मराठी साहित्य संमेलनात राडा;ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर संभाजी ब्रिगेडकडून शाईफेक

संभाजी ब्रिगेडने स्विकारली जबाबदारी

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : Shaifek from Sambhaji Brigade on senior journalist Girish Kuber। नाशिक येथे सुरू असलेल्या 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातून (Akhil Bharatiya Marathi Sahitya Samelan Nashik) एक मोठी बातमी समोर आली आहे.जेष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेकीची घटना घडली आहे. संभाजी ब्रिगेडने या घटनेची जबाबदारी घेतली आहे.

लोकसत्ताचे संपादक असलेल्या जेष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांचे काही दिवसांपुर्वी रेनिसान्स स्टेट: द अनरिटन स्टोरी ऑफ द मेकिंग ऑफ महाराष्ट्र (Renaissance State: The Unwritten Story of the Making of Maharashtra) हे पुस्तक प्रकाशित झाले आहे. या पुस्तकात छत्रपती संभाजी महाराज (Chatrpati Sambhaji Maharaj) यांच्याबद्दल अवमानकारक चुकीची माहिती लिहिल्याबद्दल शाईफेक करण्यात आल्याचे संभाजी ब्रिगेडचे नितीन रोटे पाटील यांनी सांगितले.

लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर हे रविवारी 5 रोजी नाशिक येथे सुरू असलेल्या साहित्य संमेलनातील परिसंवादात सहभागी होण्यासाठी आले होते. परिसंवादात सहभागी होण्यापूर्वीच त्यांच्यावर शाईफेक करण्यात आली. या घटनेमुळे साहित्य संमेलनात मोठी खळबळ उडाली होती.दरम्यान या घटनेचे राज्यात पडसाद उमटू लागले आहेत. शिवसेना नेते तथा सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत (Sanjay Raut) यांनी या घटनेचा निषेध नोंदवला आहे.

दरम्यान या प्रकरणात दोघा संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे.दोघे पुण्यातून संमेलनात आले होते. त्यांनी काळ्या रंगाची पावडर कुबेरांच्या अंगावर फेकली.ही घटना प्रवेशद्वाराजवळ घडली. पंकज भुजबळ यांनी दोघांना अडवण्याचा प्रयत्न केला मात्र दोघांनी काळी पावडर कुबेरांच्या अंगावर फेकली असे मंत्री छगन भुजबळ (Minister Chhagan Bhujbal) म्हणाले.

जेष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांनी लिहिलेल्या पुस्तकातील वादग्रस्त मजकुर वगळण्यात याला किंवा पुस्तकावरबंदी घालावी अशी मागणी शिवप्रेमींसह संभाजी ब्रिगेडची आहे. आजच्या घटनेमुळे हा वाद आणखीन चिघळण्याची शक्यता आहे. (Akhil Bharatiya Marathi Sahitya Samelan Nashik Shaifek from Sambhaji Brigade on senior journalist Girish Kuber)