जामखेड टाईम वृत्तसेवा । सत्तार शेख। “राजकारणात कधी काय होईल याचा भरवसा नसतो. कधी कट्टर राजकीय विरोधक मित्र बनतात; तर कधी जिवलग मित्र कट्टर राजकीय विरोधक बनताना आपण नेहमी पाहतो. राजकारणात बदलत्या राजकीय परिस्थितीनुसार होणारे निर्णय राजकीय उलथापालथ घडवणारे ठरतात. मात्र वेगवेगळ्या राजकीय पक्षात असतानाही व्यक्तीगत मैत्री अबाधित ठेवता येते याची मोजकीच उदाहरणे राज्याच्या राजकारणात आहेत.”
राज्याच्या राजकारणात पवार विरूध्द विखे (Pawar vs Vikhe) हा संघर्ष सर्वश्रूत आहे. दोन्ही राजकीय घराणे ऐकमेकांवर कुरघोड्या करण्याची एकही संधी सोडत नाहीत हे उभ्या महाराष्ट्राला माहीत आहे.परंतु बदलत्या राजकारणात या दोन्ही घराण्यातील तिसऱ्या पिढीने राजकारणात सक्रीय सहभाग घेतल्यानंतर हा संघर्ष जारी राहिल का ? याची महाराष्ट्रात नेहमी उत्सुकता असते. परंतू पवार व विखे कुटूंबातील तिसऱ्या पिढीचे राजकीय नेतृत्व करणाऱ्या तरूण तुर्क नेत्यांनी मैत्रीच्या नव्या पर्वाला सुरूवात केल्याचे आता स्पष्ट होऊ लागले आहे.
पवार व विखे या दोन्ही घराण्यातील तिसऱ्या पिढीने राजकारणात दमदार एन्ट्री केलेली आहे. डाॅ सुजय विखे पाटील (MP Dr Sujay Vikhe patil) हे भाजप कडून अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून नेतृत्व करत आहेत. विखे यांच्याच लोकसभा मतदारसंघातील कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार (MLA Rohit Pawar) हे आमदार म्हणून नेतृत्व करत आहेत.
डाॅ सुजय विखे पाटील व रोहित पवार यांची छुपी युती असल्याची चर्चा मतदारसंघात नेहमी होते. ही चर्चा खरी आहे असेही नेहमी बोलले जाते. पवार व विखे कुटूंबातील तिसरी पिढी जरी वेगवेगळ्या पक्षातून राजकारणात असली तरी राजकीय जोडे बाजुला ठेऊन हे तरूण नेते व्यक्तिगत मैत्री जपताना दिसत आहेत. काही महिन्यांपूर्वी रोहित पवार यांनी लोणीला भेट दिली होती. ते फोटो सोशल मिडीयावर जोरदार चर्चीले गेले होते.
आता आणखी एक फोटो सोशल मिडीयावर जोरदार चर्चेत आला आहे. शनिवारी खासदार सुजय विखे पाटील यांनी ट्विटरवर एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोची राज्यात चर्चा सुरू झाली आहे. या फोटोत विखे हे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे चिरंजीव तथा राष्ट्रवादीचे युवा नेते पार्थ पवार ( Parth Ajit Pawar) यांच्या समवेत विमान प्रवास करताना दिसत आहे. हाच फोटो खासदार सुजय विखे यांनी शनिवारी रात्री दहाच्या सुमारास ट्विट (Tweet) केला आहे. (New chapter of Pawar Vikhe friendship: Statewide discussion of the photo tweeted by MP Sujay Vikhe)
या फोटोला कॅप्शन देताना सुजय विखे म्हणतात की, Friendship Beyond Boundaries अर्थात सिमेपलीकडची मैत्री ! अतिशय मोजक्या शब्दांत सुजय विखे यांनी फोटोला कॅप्शन दिली आहे. हा फोटो पार्थ पवार यांना टॅग करण्यात आला आहे. दरम्यान या फोटोवरून ट्विटरवरील नेटकऱ्यांमधून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत.सोशल मिडीयावर हा फोटो जोरदार व्हायरल झाला आहे.
सध्या गेल्या काही दिवसांपासून उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या नातेवाईकांसह पार्थ पवार यांच्या कार्यालयावर केंद्रीय संस्थांकडून छापेमारी झालेली आहे. यामुळे राज्याचे राजकारण तापले आहे. केंद्र सरकार राज्यातील भाजप नेत्यांच्या सांगण्यावरून महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्यासाठी ईडी, आयकर, सीबीआय सारख्या संस्थांकरवी कारवाया करत आहे. सुडबुद्धी केंद्र सरकार वागत असल्याचा आरोप शरद पवारांपासून सगळेच नेते करताना दिसत आहेत अश्या पार्श्वभूमीवर भाजपा खासदार सुजय विखे पाटील व पार्थ पवार यांच्या एकत्रित विमान प्रवासाचे एकत्रित छायाचित्र अनेक तर्क वितर्कांना जन्म घालणारे ठरू लागले आहे.
विखे पवार मैत्रीचा हा नवा अध्याय महाराष्ट्राच्या राजकारणात नवे बदल घडवून आणणारा ठरेल का ? याचीच चर्चा आता राज्यात होऊ लागली आहे.
Friendship Beyond Boundaries..!!@parthajitpawar pic.twitter.com/j0QzfXBoST
— Dr. Sujay Vikhe Patil (@drsujayvikhe) October 16, 2021
First Publisher : jamkhedtimes.com
web titel : new chapter of pawar vikhe friendship statewide discussion of the photo tweeted by mp sujay vikhe