जामखेड टाईम्स वृत्तसेवा : मराठ्यांच्या शेवटच्या विजयी लढाईचा ऐतिहासिक साक्षीदार खर्डा येथील शिवपट्टण किल्ला.. किल्ल्याच्या प्रांगणात हजारो नागरिकांची उपस्थिती; जल्लोषमय, मंगलमय वातावरण, रणरणत्या उन्हात नागरिकांचा उत्साह शिगेला पोहचलेला.
छत्रपती शिवाजी महाराज की जय या जयघोषाने वातावरणात आलेला जोश …सर्वांच्याच नजरा अकाशाकडे भिडलेल्या.. वातावरणात जोरदार वारा सुटलेला. झेंडा वर नेण्यात अडचण तर येणार नाही ना या चिंतेने सर्वांचे श्वास रोखलेले…
स्वराज्य ध्वज जस जसा वर चढवला जात होता तसा वाऱ्याचा अडथळा येत होता.पण स्वयंसेवकांनी शर्थीचे प्रयत्न केले. अर्धा तासाच्या प्रयत्नानंतर स्वराज्य ध्वज उंच आकाशात झेपावला अन शिवपट्टण किल्ल्याच्या मैदानात एकच जल्लोष झाला. टाळ्यांच्या कडकडाटात स्वराज्य ध्वजाला हजारो नागरिकांनी सलाम केला.
ऐतिहासिक खर्डा किल्ल्याच्या मैदानावर भारतातील सर्वात उंच स्वराज्य ध्वज दसऱ्याच्या मुहूर्तावर विराजमान झाला. या ऐतिहासिक सोहळ्याचे हजारो नागरिक साक्षीदार बनले. या सोहळ्याने उपस्थित हजारो नागरिकांमध्ये नवा जोश, ऊर्जा उत्साह भरला. आज खऱ्या अर्थाने खर्डा किल्ला व परिसराचा इतिहास राज्याच्या कानाकोपऱ्यात गेला.
आमदार रोहित पवार यांनी पाहिलेलं स्वप्न आज प्रत्यक्षात सत्यात उतरले. या सोहळ्यामुळे रोहित पवारांनी राज्याच्या राजकारणात वेगळी ओळख प्रस्थापित केली.
असा रंगला स्वराज्य ध्वज प्राणप्रतिष्ठापना सोहळा !
पहा संपुर्ण सोहळा⤵️