Karjat Nagar Panchayat elections | कर्जत नगरपंचायत निवडणुकीतून कुणी घेतली माघार ? कोण राहिले रिंगणात ? काय घडलं दिवसभरात वाचा सविस्तर
जामखेड टाईम्स वृत्तसेवा : कर्जत नगरपंचायत निवडणूकीच्या (Karjat Nagar Panchayat elections) अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी 27 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज आज माघारी घेतले. अर्ज माघारी घेण्याच्या प्रक्रियेत मोठा गदारोळ झाल्याने कर्जतमध्ये दिवसभर हाय व्होल्टेज ड्रामा रंगला होता.
अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपच्या उमेदवारांवर दबावतंत्राचा वापर करून अर्ज मागे घेण्यास भाग पाडण्यात आल्याचा आरोप माजी मंत्री राम शिंदे यांनी केला. तत्पूर्वी भाजपच्या उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने राम शिंदेंवर अर्थात भाजपवर मोठी नामुष्की ओढवली. संतापलेल्या राम शिंदेंनी निवडणुक अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले. काही काळ निवडणुक अधिकाऱ्यांच्या कार्यालयात मोठा गोंधळ निर्माण झाला होता.
दरम्यान कर्जत नगरपंचायत निवडणुकीत उमेदवारी मागे घेतलेल्या उमेदवारांची यादी आता समोर आली आहे. तब्बल 27 जणांनी आपली उमेदवारी मागे घेतली. 17 जागांपैकी 13 जागांवर कर्जतमध्ये निवडणुक होत आहे. कर्जत नगरपंचायत निवडणुकीत 13 जागांसाठी 32 उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात असणार आहेत.
कर्जत नगरपंचायत निवडणुकीत प्रचाराचा गदारोळ सुरू होण्यापूर्वीच कर्जतमध्ये रोहित पवार विरूध्द राम शिंदे हा संघर्ष उफाळून आला आहे. आमदार रोहित पवारांनी निवडणुकीच्या निकालाआधीच राम शिंदेंना दिलेला धक्का भाजपला बॅकफूटवर ढकलणारा ठरला आहे. आता प्रचाराच्या रणधुमाळीत शिंदे विरूध्द पवार संघर्ष कोणत्या टोकाला जाणार याकडे कर्जतकरांचे लक्ष लागले आहे.
खालील उमेदवारांनी उमेदवारी मागे घेतली
निता भाऊसाहेब पिसाळ | वार्ड क्रमांक 11 |
---|---|
अंकिता निखील नेटके | वार्ड क्रमांक 11 |
अंकुश तात्याबा दळवी | वार्ड क्रमांक 17 |
अनिल भिमराव भैलूमे | वार्ड क्रमांक 15 |
अशोक अजिनाथ डोंगरे, | वार्ड क्रमांक 17 |
अश्विनी पांडुरंग क्षीरसागर | वार्ड क्रमांक 04 |
उत्तम श्रीपती शिंदे | वार्ड क्रमांक 12 |
कांचन राजेंद्र खेत्रे | वार्ड क्रमांक 10 |
दादासाहेब अर्जुन सोनमाळी | वार्ड क्रमांक 17 |
दादासाहेब बबन रासकर | वार्ड क्रमांक 08 |
नज्मा अब्बास बागवान | वार्ड क्रमांक 14 |
नंदकिशोर अमृत शेलार | वार्ड क्रमांक 17 |
निता अजिनाथ कचरे | वार्ड क्रमांक 02 |
पुजा अनिल कचरे | वार्ड क्रमांक 02 |
पुजा संतोष मेहेत्रे | वार्ड क्रमांक 17 |
प्रसाद जीवन ढोकरीकर | वार्ड क्रमांक 06 |
प्रियंका अमोल वीर | वार्ड क्रमांक 02 |
प्रियंका केतन खरात | वार्ड क्रमांक 02 |
रत्नमाला प्रभाकर साळुंखे | वार्ड क्रमांक 14 |
रविंद्र लिलाचंद कोठारी | वार्ड क्रमांक 17 |
राखी वैभव शहा | वार्ड क्रमांक 13 |
रोहिणी सचिन घुले | वार्ड क्रमांक 04 |
सचिन विठ्ठलराव घुले | वार्ड क्रमांक 09 |
सचिन विठ्ठलराव घुले | वार्ड क्रमांक 12 |
सविता विष्णू शिंदे | वार्ड क्रमांक 11 |
सुनंदा अंबादास पिसाळ | वार्ड क्रमांक 11 |
हर्षदा अमृत काळदाते | वार्ड क्रमांक 08 |
१३ जागेसाठी ३२ उमेदवार रिंगणात असून उर्वरित चार प्रभागाची निवडणूक हे प्रभाग ना.मा. प्र.(OBC)असल्याने नुकत्याच सुप्रीम कोर्टाने दिलेल्या स्थगिती आदेशाने प्रलंबित ठेवण्यात आल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.यात प्रभाग क्र.२जोगेश्वरवाडी प्रभागात ऐनवेळी नाट्यमय घडामोडी होऊन भाजपाच्या उमेदवार नीता अजिनाथ कचरे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने या उमेदवारावर दबाव निर्माण करून विरोधी पक्षाने अर्ज माघारी घ्यायला लावल्याचा आरोप करून माजीमंत्री प्रा.राम शिंदे आणि भाजपा पदाधिकाऱ्यांची प्रशासनातील अधिकाऱ्यांशी शाब्दिक चकमक झाली.या नंतर माजीमंत्री प्रा.राम शिंदे आणि भाजपा पदाधिकाऱ्यांनी श्री.संत गोदड महाराज मंदिरा समोर राम शिंदे यांनी मौनव्रत धारण करून ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.
बिनविरोध बाबत सध्या निर्णय नाही
प्रभाग दोन मध्ये लंकाबाई देवीदास खरात यांचा राष्ट्रवादी काँग्रेसकडून एकमेव उमेदवारी अर्ज शिल्लक राहिल्याने बिनविरोध झाल्याची चर्चा सुरू असताना या बाबत प्रशासनाने खरात यांच्या उमेदवारी अर्जावर न्यायालयात आक्षेप घेण्यात आला असल्याने त्यावर आता भाष्य करता येणार नाही असे निवडणूक प्रशासनाने सांगितले आहे.
निवडणूक निरीक्षक प्रकाश वायचळ यांची कर्जतला भेट
नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी निवडणूक निरीक्षक तथा अप्पर जिल्हाधिकारी प्रकाश वायचळ यांनी एकूण निवडणुकीचा आढावा घेऊन मुख्याधिकारी गोविंद जाधव,नायब तहसीलदार सुरेश वाघचौरे यांच्यासह निवडणूक केंद्रांची पाहणी केली.
प्रभागनिहाय उमेदवार व पक्ष खालीलप्रमाणे
उमेदवाराचे नाव | पक्ष | प्रभाग |
---|---|---|
खरात लंकाबाई देविदास | राष्ट्रवादी | प्रभाग क्रमांक २ |
गायकवाड अश्विनी सोमनाथ | भाजपा | प्रभाग क्रमांक ४ |
सोनमाळी मनीषा सचिन | राष्ट्रवादी | प्रभाग क्रमांक ४ |
क्षीरसागर आशाबाई बाळासाहेब | रा स प | प्रभाग क्रमांक ४ |
तोटे मोनाली ओंकार | राष्ट्रीय काँग्रेस | प्रभाग ६ |
क्षीरसागर गणेश नवनाथ | भाजपा) | प्रभाग ६ |
थोरात दिनेश बाळू | शिवसेना | प्रभाग ६ |
लाढाणे बबनराव सदाशिव | भाजपा | प्रभाग क्रमांक ८ |
भाऊसाहेब सुधाकर | राष्ट्रीय काँग्रेस | प्रभाग क्रमांक ८ |
जपे उमेश शंकर | भाजपा | प्रभाग क्रमांक ९ |
सोमनाथ हरी | वंचित | प्रभाग क्रमांक ९ |
काळदाते अमृत श्रीधर | राष्ट्रवादी | प्रभाग क्रमांक ९ |
गदादे मोनिका अनिल | भाजपा | प्रभाग क्रमांक १० |
राऊत उषा अक्षय | राष्ट्रवादी | प्रभाग क्रमांक १० |
पिसाळ मोहिनी दत्तात्रेय | भाजपा | प्रभाग क्रमांक ११ |
नेटके ऐश्वर्या विजय | राष्ट्रवादी | प्रभाग क्रमांक ११ |
मेहेत्रे शरद रामभाऊ | भाजपा | प्रभाग क्रमांक १२ |
राऊत नामदेव चंद्रकांत | राष्ट्रवादी | प्रभाग क्रमांक १२ |
सुपेकर सुवर्णा रवींद्र | राष्ट्रवादी | प्रभाग क्रमांक १३ |
शिंदे वनिता परशुराम | भाजपा | प्रभाग क्रमांक १३ |
सय्यद शिबा तारीख | भाजपा | प्रभाग क्रमांक १४ |
कुलथे ताराबाई सुरेश | राष्ट्रवादी | प्रभाग क्रमांक १४ |
भैलुमे संजय शाहूराव | भाजपा | प्रभाग क्रमांक १५ |
भैलुमे अनिल विश्वनाथ | वंचित | प्रभाग क्रमांक १५ |
भैलूमे संतोष आप्पा | (अपक्ष | प्रभाग क्रमांक १५ |
भैलुमे भास्कर बाबासाहेब | राष्ट्रवादी | प्रभाग क्रमांक १५ |
काकडे सुवर्णा विशाल | भाजपा | प्रभाग क्रमांक १६ |
भैलुमे निर्मला दीपक | वंचित | प्रभाग क्रमांक १६ |
भैलूमे प्रतिभा नंदकिशोर | राष्ट्रवादी | प्रभाग क्रमांक १६ |
गदादे अनिल मारुती | भाजपा | प्रभाग क्रमांक १७ |
आगम धनंजय दादासाहेब | अपक्ष | प्रभाग क्रमांक १७ |
शेलार छाया सुनिल | राष्ट्रवादी | प्रभाग क्रमांक १७ |
न्यूज : डाॅ अफरोज पठाण, कर्जत प्रतिनिधी
न्यूज एडिट : सत्तार शेख, संपादक