जामखेड तालुक्यात बुथ सशक्तीकरण मोहिम ताकदीने राबवा – जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, जामखेडमध्ये उत्साहात पार पडली बुथ सशक्तीकरण आढावा बैठक !
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : सत्तार शेख। गुजरातमध्ये बुथ समितीने केलेल्या दमदार कामामुळेच गुजरात विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या जागा वाढल्या, आता हाच फाॅर्म्यूला देशभर राबवला जाणार आहे. बुथ सशक्तीकरण मोहिम जे कार्यकर्ते ताकदीने राबवतील त्यांची पक्षाकडून योग्य दखल घेतली जाणार आहे.जे शक्तीकेंद्र प्रमुख आपली जबाबदारी नीट पार पाडत नाहीत, त्यांना हटवून नव्या दमाच्या कार्यकर्त्याला संधी द्यावी, पक्षाचे संघटन मजबुत होणे महत्वाचे आहे. बुथ सशक्तीकरण मोहिम त्यादृष्टीने महत्वाची आहे. त्यामुळे येत्या 20 एप्रिल पर्यंत जामखेड तालुक्यातील सर्वच बुथचा डाटा दिलेल्या सूचनेप्रमाणे संकलित करावा. 21 एप्रिल रोजी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत जिल्ह्याचा आढावा होणार आहे. यावेळी तालुकाध्यक्षासह तालुक्यातील नेत्यांना बुथ सशक्तीकरण मौहिमेबाबत विचारणा होईल. त्यामुळे सर्वांनी बुथ समितीचे काम ताकदीने करावे. जिल्ह्यात जामखेड तालुका एक नंबरवर आणावा, असे अवाहन भाजपचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे यांनी केले.
आगामी लोकसभा व विधानसभा तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांसाठी भारतीय जनता पार्टीने जोरदार कंबर कसली आहे. या निवडणूका भाजप पुर्ण ताकदीनीशी लढवणार आहे.त्यादृष्टीने भाजपकडून बुथ सशक्तीकरण मोहिम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेच्या माध्यमांतून सर्व निवडणूकांसाठी भाजपने विजयाचा संकल्प केला आहे.त्यानुसार भाजपकडून पक्षबांधणी तसेच केंद्र व राज्य सरकारची कामगिरी जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी बुथ सशक्तीकरण मोहिम हाती घेण्यात आली आहे. त्यादृष्टीने शनिवार दि 15 रोजी भारतीय जनता पार्टीचे अहमदनगर दक्षिण जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली जामखेड तालुका भारतीय जनता पार्टीची बुथ सशक्तीकरण बैठक घेण्यात आली. ही बैठक विठाई मंगल कार्यालयात मोठ्या उत्साहात पार पडली.
या बैठकीत जामखेड तालुक्यातील बुथ सशक्तीकरण मोहिमेचा आढावा घेण्यात आला. यावेळी तालुकाध्यक्ष अजय दादा काशिद यांनी जामखेड तालुक्याचा अहवाल मांडला. त्यानंतर जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे यांनी बुथ सशक्तीकरण मोहिमेबाबत उपस्थित कार्यकर्त्यांना सखोल मार्गदर्शन केले. यावेळी पक्षाचे जिल्हा सरचिटणीस सचिन पोटरे, बाळासाहेब महाडिक, कर्जत जामखेड विधानसभा प्रमुख रविंद्र सुरवसे, माजी सभापती भगवान मुरुमकर यांनीही कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी बोलताना जिल्हा सरचिटणीस सचिन पोटरे म्हणाले की, येत्या 30 एप्रिल रोजी ‘मन की बात’ या कार्यक्रमाचा 100 वा कार्यक्रम आहे. हा कार्यक्रम तालुक्यातील प्रत्येक बुथवर घ्यावा. त्याचे फोटो सरल ऐपवर अपलोड करावेत, असे अवाहन यावेळी पोटरे यांनी केले.
या बैठकीसाठी जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, जिल्हा सरचिटणीस सचिन पोटरे, बाळासाहेब महाडिक, भाजपा तालुकाध्यक्ष अजय दादा काशीद, कर्जत-जामखेड विधानसभा प्रमुख रवि सुरवसे, माजी सभापती डाॅ भगवान मुरुमकर, जिल्हा परिषद सदस्य सोमनाथ पाचरणे, कर्जत शहराध्यक्ष गणेश क्षीरसागर, सरचिटणीस शेखर खरमरे, जामखेड शहराध्यक्ष बिभीषण धनवडे, मजुर फेडरेशनचे माजी संचालक मनोज कुलकर्णी, ज्योती क्रांतीचे चेअरमन अजिनाथ हजारे, पांडुरंग उबाळे, सरचिटणीस लहू शिंदे, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष शरद कार्ले, महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा मनिषा मोहळकर, विधी आघाडीचे ॲड प्रविण सानप, प्रविणशेठ चोरडिया, ओबीसी आघाडीचे तालुकाध्यक्ष गौतम कोल्हे, नगरसेवक अमित चिंतामणी, पिंपरखेडचे माजी सरपंच बापुराव ढवळे, माजी सभापती तुषार पवार, सोमनाथ राळेभात, तात्याराम पोकळे, बाजीराव गोपाळघरे, डाॅ गणेश जगताप, डाॅ बाळासाहेब बोराटे, उदयसिंह पवार, प्रसिध्दी प्रमुख उध्दव हुलगुंडे, आप्पासाहेब ढगे, ऋषीकेश मोरे, तुषार बोथरा सह आदी पदाधिकारी तसेच सर्व बुथ प्रमुख, सर्व शक्तीकेंद्र प्रमुख आणि कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.