Ram Shinde Karjat News | रोहित पवारांच्या दबावतंत्राविरोधात संतापलेल्या राम शिंदेंचे मौनव्रत ठिय्या अंदोलन सुरू
कर्जतमध्ये राम शिंदे विरूध्द रोहित पवार संघर्ष शिगेला
जामखेड टाईम्स वृत्तसेवा | सत्तार शेख | Ram Shinde Karjat News | कर्जत नगरपंचायत निवडणुकीत (Karjat Nagar Panchayat election) मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत.अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस असल्याने सत्ताधारी गटाकडून दबावतंत्राचा वापर करून भाजपच्या उमेदवारांचे अर्ज मागे घेतले असल्याचा गंभीर आरोप भाजपने केल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
भाजपच्या उमेदवारांवर आमदार रोहित पवारांच्या दबाव व दडपशाहीत भारतीय जनता पक्षाचे फॉर्म काढण्यात आल्याचा खळबळजनक आरोप माजी मंत्री राम शिंदे यांनी केल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
माजी मंत्री राम शिंदे यांनी या संदर्भात एक ट्विट केले आहे. कर्जतमध्ये सुरू असलेल्या दबावतंत्राच्या निषेधार्थ माजी मंत्री राम शिंदे यांनी संत शिरोमणी गोदड महाराज मंदिरा समोर मौनव्रत ठिय्या आंदोलन सुरू केल्याची माहिती समोर येत आहे.
राम शिंदे यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, कर्जत नगरपंचायत जि अहमदनगर निवडणुकीत आमदारांच्या दबाव व दडपशाहीत भारतीय जनता पक्षाचे फॉर्म काढले त्यामुळे संत शिरोमणी गोदड महाराज मंदिरा समोर न्याय हक्कासाठी मौनव्रत ठिय्या आंदोलन सुरू करण्याची घोषणा करत अंदोलन सुरू करण्यात आले आहेत.
दरम्यान प्रांताधिकारी डॉ अजित थोरबोले व राम शिंदे यांची खडाजंगी झाल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये राम शिंदे हे प्रचंड आक्रमक व संतप्त झाल्याचे दिसत आहेत. सध्या शिंदे यांचे गोदड महाराज मंदिरासमोर न्याय हक्कासाठी मौनव्रत ठिय्या अंदोलन सुरू आहे.
कर्जत नगरपंचायतमध्ये 17 जागांसाठी निवडणूक होत आहे. यात ओबीसी आरक्षणाच्या जागांवरील निवडणूका स्थगित झाल्याने 13 जागांवर निवडणूक होत आहे. आज अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपच्या चार ते पाच उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने मोठ्या राजकीय गोंधळ उडाला. संतापलेल्या राम शिंदेंनी भाजपच्या उमेदवारांवर आमदारांकडून दबाव टाकण्यात आल्याचा आरोप करण्यात आला.
कर्जत नगरपंचायत निवडणुकीत आज घडत असलेल्या घडामोडींमुळे ही निवडणूक वेगळ्या वळणावर येऊन ठेपली आहे. प्रत्यक्ष मतमोजणीच्या दिवसापर्यंत येथील निवडणुकीत रोहित पवार विरूध्द राम शिंदे हा संघर्ष आणखीन काय काय वळण घेणार हे पाहणे रंजक ठरणार आहे.
कर्जत नगरपंचायत जि अहमदनगर निवडणुकीत आमदारांच्या दबाव व दडपशाहीत भारतीय जनता पक्षाचे फॉर्म काढले त्यामुळे संत शिरोमणी गोदड महाराज मंदिरा समोर न्याय हक्कासाठी मौन ठिय्या आंदोलन सुरू
— Prof.Ram Shinde (@RamShindeMLA) December 13, 2021