Rohit Pawar News | जामखेड टाईम्स वृत्तसेवा । सत्तार शेख ।कोरोनाच्या काळामध्ये राष्ट्रवादीचे (NCP) पदाधिकारी जनतेच्या हितासाठी काम करत होते. जिथे कुठे लोकांना अडचण येईल तिथे आम्ही सर्वजण काम करत होतो. मात्र जेव्हा लोकांना खरीच तुमची गरज होती, त्यावेळेस तुम्ही लोकांना मदत करायला पाहिजे होती. परंतू तुम्ही घरी बसला नाहीतर पुण्याला जाऊन बसलात. इलेक्शन (Election) आल्यानंतरच तुम्ही अचानक दिसायला लागता अशी घणाघाती टीका करत आमदार रोहित पवार यांनी राम शिंदे यांचे चांगलेच वाभाडे काढले. (Rohit Pawar vs Ram Shinde)
आमदार रोहित पवार यांच्या उपस्थितीत भाजपच्या (BJP workers joined NCP) असंख्य कार्यकर्त्यांनी मंगळवारी जामखेड तालुक्यातील नान्नज (Nannaj) येथे आयोजित कार्यक्रमात राष्ट्रवादीत प्रवेश केला. यावेळी झालेल्या सभेत पवार यांनी राम शिंदे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला.
यावेळी बोलताना रोहित पवार म्हणाले की, लोकांना जेव्हा तुमची गरज असते तेव्हा तुम्ही गायब होता आणि जेव्हा तुम्हाला लोकांची गरज असते, पदाधिकाऱ्यांची गरज असते, चांगल्या कार्यकर्त्याची गरज असते म्हणजे इलेक्शनच्या काळामध्ये तुम्हाला लोकांची, कार्यकर्त्यांची, पदाधिकाऱ्यांची आठवण येते. मला तुम्हाला हेच अवाहन करायचयं अश्या प्रकारच्या राजकारणाचा कुणालाच फायदा होत नसतो.
पवार पुढे म्हणाले, राजकारण कसं पाहिजे तर स्वच्छ पाहिजे, राजकारण कसं पाहिजे तर मनापासून पाहिजे. विरोध करायचाय तर मनापासून विरोध करू पण विरोध करत असताना आपल्या जनतेला सोडून पळून जायचं नसतं. नाहीतर कोरोना आला की तुम्ही पळून गेला आणि काय म्हणाला तुम्ही मी पडलोय. अरे तुम्ही पडला असला तरी तुम्हाला सुध्दा कर्जत – जामखेडच्या लोकांनी मतदान केलयं ना ? मग त्यांच्यासाठी तुम्ही त्याठिकाणी अडचणीच्या काळात पळून जाता ? असा रोखठोक सवाल करत जोरदार हल्ला चढवला आणि अश्या प्रकारच्या राजकारणाला आपल्याला बाजूला ठेवायचयं असे अवाहन पवार यांनी उपस्थितांना केले.
पुढे बोलताना पवार म्हणाले की, दोन वर्षे कोरोनाची अडचण असतानासुद्धा मतदारसंघात विकासाचे कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. दोन वर्षांत मी आमदार असताना जेव्हडी विकास कामे मंजूर करून आणली ना तितकीच कामे मंत्री असतानासुध्दा गेल्या पाच वर्षांत राम शिंदेंनी मंजुर केली नव्हती असे टीकास्त्र सोडत पवार यांनी राम शिंदेंचा जोरदार समाचार घेतला.