आमदार प्रा राम शिंदे यांना निवडणूक लढवण्यासाठी उद्योजक लालासाहेब उबाळे यांच्याकडून 1 लाख रूपयांची आर्थिक मदत

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात यंदा होत असलेल्या निवडणूकीत धनशक्ती विरूध्द जनशक्ती असा थेट सामना आहे. रोहित पवाररूपी धनदांडग्या बलाढ्य अश्या हुकुमशाही धनशक्तीला परतवून लावण्यासाठी मतदारसंघातील गोरगरीब जनता आमदार प्रा राम शिंदे यांच्या पाठीशी एकवटली आहे.आमदार प्रा राम शिंदे यांचे कट्टर समर्थक असलेले पांडुरंग उबाळे यांचे चुलते तथा मुंबई येथील उद्योजक लालासाहेब उबाळे यांनी आमदार राम शिंदे यांना निवडणूक लढवण्यासाठी 1 लाख रूपयांची आर्थिक मदत केली आहे.

1 lakh rupees financial help from entrepreneur Lalasaheb Ubale to MLA Prof. Ram Shinde to contest elections

कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघाचे भाजप महायुतीचे उमेदवार प्रा. राम शिंदे यांनी विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी आर्थिक अडचण असल्याचे सांगत जनतेने आर्थिक मदत करावी असे आवाहन केले होते. त्यानुसार भाजपा तालुका सरचिटणीस पांडूरंग उबाळे यांचे चुलते तथा मुंबई येथील उद्योजक लालासाहेब उबाळे यांनी आमदार राम शिंदे यांना विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी १ लाख रूपयांची आर्थिक मदत केली.यंदाची विधानसभा निवडणूक गोरगरिब जनतेने व स्वाभिमानी कार्यकर्त्यांनी हातात घेतली आहे.

यंदा होत असलेल्या कर्जत जामखेड विधानसभा निवडणुकीत मतदारसंघातील सर्वसामान्य गोरगरिब जनता आमदार प्रा.राम शिंदे यांच्या पाठीशी मोठ्या ताकदीने एकवटली. आमदार राम शिंदेंना विधानसभा निवडणुक लढवण्यासाठी सर्वसामान्य गोरगरिब जनतेने वर्गणी गोळा करून आर्थिक मदत केली. यामुळे या निवडणुकीत आमदार शिंदे यांच्या पाठीशी जनशक्ती मोठ्या ताकदीने एकवटल्याचे संपुर्ण प्रचारात दिसून आले.

बारामतीच्या पार्सलला जनशक्तीची ताकद दाखवण्यासाठी जनता एकवटल्यामुळे भूमिपुत्र आमदार प्रा राम शिंदे यांचा विजय निश्चित मानला जात आहे. चोंडी येथील रहिवासी असलेले उद्योजक लालासाहेब उबाळे यांनी गोरगरिब जनतेने हाती घेतलेल्या लढ्याला बळ देण्यासाठी आमदार शिंदे यांना एक लाख रूपयांची आर्थिक मदत केली. उद्योजक लालासाहेब उबाळे हे भाजपाचे तालुका सरचिटणीस पांडूरंग उबाळे यांचे चुलते आहेत. तसेच ते मुंबई महानगर पलिकेतील वार्ड ३८ चे भाजपचे अध्यक्ष आहेत.