आमदार प्रा.राम शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त कर्जतमध्ये होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन – महेश तनपुरे
जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सत्तार शेख । १० जानेवारी २०२४ । राज्याचे माजी मंत्री तथा आमदार प्रा.राम शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त कर्जत – जामखेड मतदारसंघात गेल्या पंधरा दिवसांपासून विविध सामाजिक उपक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम, आरोग्य शिबिरे, शालेय विद्यार्थ्यांना साहित्य वाटप, क्रिकेट स्पर्धा, कुस्ती मैदान, किर्तन सोहळा अश्या विविध उपक्रमांची जोरदार रेलचेल सुरू आहे. गावागावात उत्साहाचे वातावरण आहे. यामुळे अवघा मतदारसंघ राम शिंदेमय झाला आहे. अजूनही मतदारसंघात कार्यक्रमांची रेलचेल सुरूच आहे. येत्या १२ जानेवारी २०२४ ला खास महिलांसाठी होम मिनिस्टर या कार्यक्रमाचे कर्जत शहरात आयोजन करण्यात आले आहे.
कर्जत-जामखेडचे भाग्यविधाते आमदार प्रा.राम शिंदे यांचा दरवर्षी १ जानेवारीला वाढदिवस असतो. डिसेंबर २०२३ च्या शेवटच्या आठवड्यापासूनच यंदा त्यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यास सुरुवात झाली. गेल्या १५ दिवसांपासून आमदार प्रा.राम शिंदे यांचा वाढदिवस मोठ्या धुमधडाक्यात मतदारसंघात साजरा केला जात आहे. येत्या १२ जानेवारीला पै प्रवीणदादा घुले मित्रमंडळ आणि राजमाता जिजाऊ प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने खास महिलांसाठी होम मिनिस्टर व डान्सचा धमाका या मेजवानीचे आयोजन करण्यात आली आहे, अशी माहिती राजमाता जिजाऊ प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेश तनपुरे यांनी दिली.
आमदार प्रा राम शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त कर्जत-जामखेड मतदारसंघात विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. याच अनुषंगाने शुक्रवार, दि १२ रोजी सायंकाळी ६ वाजता पै प्रवीणदादा घुले मित्रमंडळ आणि राजमाता जिजाऊ प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने कर्जत शहरातील फाळके पेट्रोल पंपाच्या शेजारील मैदानात महिलांसाठी होम मिनिस्टर कार्यक्रम पार पडणार आहे. यातील विजेत्या महिलांना स्कुटी, वॉशिंग मशीन, फ्रीज यासह मानाची पैठणीसह सोन्याची नथ बक्षीस म्हणून भेट मिळणार आहे.
होम मिनिस्टर कार्यक्रमाबरोबरच डान्सचा धमाका या कार्यक्रमाचीही मेजवानी यावेळी कर्जतकरांना अनुभवता येणार आहे. यामध्ये अभिनेत्री मानसी नाईक, रुपाली भोसले, अभिनेते प्रियदर्शन जाधव आदीच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. या सांस्कृतिक कार्यक्रमास कर्जतमधील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे अवाहन प्रवीणदादा घुले मित्रमंडळ आणि राजमाता जिजाऊ प्रतिष्ठानाच्यावतीने अध्यक्ष महेश तनपुरे यांनी केले आहे. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सरपंच विलास निकत, विजय मोरे, महेंद्र धांडे, अमोल भगत आदी विशेष मेहनत घेत आहेत.