जामखेड टाईम्स (Jamkhed) | जामखेड तालुक्यात बुधवारी कोरोना काहीसा थंडावला

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : बुधवारी कोरोना काहीसा थंडावला मात्र जामखेड तालुक्यात कोरोनाचा कहर सुरूच आहे. दिवसभरात जामखेड तालुक्यात एकुण १९ नवे कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले आहेत.19 new corona affected found in Jamkhed taluka on Wednesday

जामखेड तालुका आरोग्य विभागाने दिवसभरात तब्बल ६५२ नागरिकांच्या रॅपिड अँटीजेन चाचण्या केल्या तर ४५४ नागरिकांचे RTPCR स्वॅबनमुने कोरोना तपासणीसाठी अहमदनगर जिल्हा रूग्णालयात पाठवण्यात आले आहेत.

दिवसभरात आढळून आलेल्या नव्या कोरोना बाधितांमध्ये जामखेड शहरात एकही रूग्ण आढळून आला नाही. दिवसभरात आढळून आलेले सर्व रूग्ण ग्रामीण भागातील आहेत.

यामध्ये मतेवाडी  ०२, जवळा ०५, साकत ०२, वाघा ०२, वंजारवाडी ०४, फक्राबाद ०२, धोतरी ०१, नान्नज ०१ या १९ रूग्णांचा समावेश आहे अशी माहिती जामखेड ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ संजय वाघ यांनी सायंकाळी माध्यमांशी बोलताना दिली.

Medical Superintendent of Jamkhed Rural Hospital Dr. Sanjay Wagh informed that 19 new corona patients were found in Jamkhed taluka on Wednesday.