जामखेड तालुक्यातील 37 गावांमधील 30 हेक्टर गायरान जमिनीवर 1998 बेकायदेशीर बांधकामे, जाणून घ्या कुठल्या गावात किती अतिक्रमणे ?
जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सत्तार शेख । राज्यातील सरकारी गायरान जमिनींवरील अतिक्रमणे हटवण्यासाठी सरकारकडून जोरदार हालचाली सुरु आहेत. यासाठी प्रशासनाकडून मोजमाप घेण्यात आली आहेत.जामखेड तालुक्यातील माहिती संकलनाचे काम पुर्ण झाले आहे. प्रशासनाच्या तपासणीत जामखेड तालुक्यातील 37 गावांमधील अंदाजे 30 हेक्टर गायरान क्षेत्रावर 1998 बेकायदेशीर विनापरवाना बांधकामे आढळून आले आहेत, अजून हा आकडा वाढण्याची शक्यता आहे.अशी माहिती तहसीलदार योगेश चंद्रे यांनी दिली.
राज्यातील गायरान जमिनींवरील अतिक्रमणे हटवावीत यासाठी हायकोर्टात जनहित याचिका दाखल होती. या याचिकेवर कोर्टाने राज्यातील सरकारी गायरान जमिनींवरील अतिक्रमणे हटवण्याचे आदेश सरकारला दिले आहेत. त्यानुसार शिंदे-फडणवीस सरकारने राज्यातील अतिक्रमणांची माहिती संकलीत करण्याचे काम हाती घेतले आहे.
जामखेड तालुक्यातील गायरान जागेवरील अतिक्रमणांची माहिती संकलित करण्याचे काम जामखेड तालुका प्रशासनाने हाती घेतले होते. मिळालेल्या माहितीनुसार 87 गावांपैकी 37 गावांमधील 1 हजार 168 हेक्टर गायरान जमिनींवर तब्बल 30 हेक्टर क्षेत्रावर अतिक्रमण झाले असून यात तब्बल 1998 बांधकामांचे अतिक्रमणे करण्यात आली आहेत, अशी माहिती समोर आली आहे.
दरम्यान, गायरान जमिनींवरील अतिक्रमणे डिसेंबर अखेर हटवावीत असे आदेश हायकोर्टाने राज्य सरकारला दिले आहेत. या आदेशामुळे राज्यातील लाखो लोक बेघर होण्याचा धोका निर्माण झाला. दरम्यान प्रशासनाने गायरान जमिनींवरील अतिक्रमणांची माहिती संकलित केल्यानंतर अतिक्रमण धारकांना नोटीसा बजावण्यास सुरुवात केल्याने अनेकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे.
जामखेड तालुक्यातील गावनिहाय गायरान जमिनींवरील अतिक्रमण खालील प्रमाणे
1) मोहा गावात गट नंबर 320 मध्ये एकुण 5.22 हेक्टर गायरान क्षेत्र आहे. यातील 0.06 क्षेत्रावर अतिक्रमण करण्यात आले आहे. यामध्ये बेकायदेशीर विनापरवाना बांधकामांची संख्या 6 आहे.
2) जांबवाडीत गट नंबर 358 मध्ये एकुण 14.27 हेक्टर गायरान क्षेत्र आहे. यामध्ये 2.12 हेक्टर क्षेत्रावर अतिक्रमण आहे. यामध्ये बेकायदेशीर विनापरवाना बांधकामांची संख्या 92 आहे.
3) साकतमधील गट नंबर 968, 1360, 1420, 961/1, 961/2 यामध्ये एकुण 27 हेक्टर गायरान क्षेत्र आहे. यामध्ये 3.71 हेक्टर क्षेत्रावर अतिक्रमण आहे. यामध्ये बेकायदेशीर विनापरवाना बांधकामांची संख्या 345 इतकी आहे.
4) शिऊर गावातील गट नंबर 20/1, 685, 414 यामध्ये एकुण 16.70 हेक्टर गायरान क्षेत्र आहे. यामध्ये 0.875 क्षेत्रावर अतिक्रमण आहे. यामध्ये बेकायदेशीर विनापरवाना बांधकामांची संख्या 67 इतकी आहे.
5) सावरगाव गावातील गट नंबर 606, 439 मध्ये एकुण 193.26 हेक्टर गायरान क्षेत्र आहे. यामध्ये 1.37 हेक्टर क्षेत्रावर अतिक्रमण झालेले आहे. यात बेकायदेशीर विनापरवाना बांधकामांची संख्या 46 इतकी आहे.
6) पाडळीतील गट नंबर 414 मध्ये 7.53 गायरान क्षेत्र आहे. यातील 0.42 क्षेत्रावर अतिक्रमण आहे. यामध्ये बेकायदेशीर विनापरवाना बांधकामांची संख्या 42 इतकी आहे.
7) झिक्री गावातील गट नंबर 115 मध्ये 5.20 गायरान क्षेत्र आहे. यातील 0.01 क्षेत्रावर अतिक्रमण आहे.यामध्ये बेकायदेशीर विनापरवाना बांधकामांची संख्या एक आहे.
8) खुरदैठण गावातील गट नंबर 307 मध्ये एकुण 8.72 हेक्टर गायरान क्षेत्र आहे. यातील 0.15 हेक्टर क्षेत्रावर अतिक्रमण आहे. यामध्ये बेकायदेशीर विनापरवाना बांधकामांची संख्या 14 इतकी आहे.
9) कुसडगाव गावातील गट नंबर 412,413,63 मध्ये एकुण 56.37 हेक्टर गायरान क्षेत्र आहे. यातील 0.55 क्षेत्रावर अतिक्रमण आहे. यामध्ये बेकायदेशीर विनापरवाना बांधकामांची संख्या 23 इतकी आहे.
10) पिंपरखेड गावातील गट नंबर 486/2 मध्ये 16.76 हेक्टर गायरान क्षेत्र आहे. यातील 0.45 हेक्टर क्षेत्रावर अतिक्रमण आहे. यामध्ये बेकायदेशीर विनापरवाना बांधकामांची संख्या 3 इतकी आहे.
11) हसनाबाद गावातील गट नंबर एकमध्ये 11.41 हेक्टर गायरान क्षेत्र आहे. यातील 0.105 हेक्टर क्षेत्रावर अतिक्रमण आहे.यामध्ये बेकायदेशीर विनापरवाना बांधकामांची संख्या 21 इतकी आहे.
12) कवडगाव मधील गट नंबर 1, 17 मध्ये 35.21 हेक्टर गायरान क्षेत्र आहे. यामध्ये 1. 72 हेक्टर क्षेत्रावर अतिक्रमण आहे. यामध्ये बेकायदेशीर विनापरवाना बांधकामांची संख्या 134 इतकी आहे.
13) भवरवाडीतील गट नंबर 273 मध्ये 3.39 हेक्टर गायरान क्षेत्र आहे. यातील 0.65 हेक्टर क्षेत्रावर अतिक्रमण आहे. यामध्ये बेकायदेशीर विनापरवाना बांधकामांची संख्या 64 इतकी आहे.
14) खांडवी गावातील गट नंबर 80, 106 मध्ये 20.47 हेक्टर गायरान क्षेत्र आहे. यातील 1.22 क्षेत्रावर अतिक्रमण आहे. यामध्ये बेकायदेशीर विनापरवाना बांधकामांची संख्या 61 इतकी आहे.
15) धोंडपारगाव येथील गट नंबर 149, 152 मध्ये 2.57 हेक्टर गायरान क्षेत्र आहे. यातील 0.86 हेक्टर क्षेत्रावर अतिक्रमण आहे. यामध्ये बेकायदेशीर विनापरवाना बांधकामांची संख्या 43 इतकी आहे.
16) फक्राबाद गावातील गट नंबर 610 मध्ये 1.77 हेक्टर गायरान क्षेत्र आहे. यातील 0.48 हेक्टर क्षेत्रावर अतिक्रमण आहे. यामध्ये बेकायदेशीर विनापरवाना बांधकामांची संख्या 15 इतकी आहे.
17) धानोरा गावातील गट नंबर 147 मध्ये 0.94 हेक्टर गायरान क्षेत्र आहे. यातील 0.06 हेक्टर क्षेत्रावर अतिक्रमण आहे. यामध्ये बेकायदेशीर विनापरवाना बांधकामांची संख्या 2 इतकी आहे.
18) वंजारवाडी गावातील गट नंबर 41 मध्ये 11.75 हेक्टर गायरान क्षेत्र आहे. यातील 1.97 हेक्टर क्षेत्रावर अतिक्रमण आहे. यामध्ये बेकायदेशीर विनापरवाना बांधकामांची संख्या 57 इतकी आहे.
19) आघी गावातील गट नंबर 25 मध्ये 12.88 हेक्टर गायरान क्षेत्र आहे. यातील 0.91 हेक्टर क्षेत्रावर अतिक्रमण आहे. यामध्ये बेकायदेशीर विनापरवाना बांधकामांची संख्या 49 इतकी आहे.
20) राजेवाडीतील गट नंबर 206, 207 मध्ये 46.24 हेक्टर गायरान क्षेत्र आहे. यातील 2.67 हेक्टर क्षेत्रावर अतिक्रमण आहे. यामध्ये बेकायदेशीर विनापरवाना बांधकामांची संख्या 50 इतकी आहे.
21) घोडेगाव मधील गट नंबर 422 मध्ये 13.21 हेक्टर गायरान क्षेत्र आहे. यातील 0.03 हेक्टर क्षेत्रावर अतिक्रमण आहे. यामध्ये बेकायदेशीर विनापरवाना बांधकामांची संख्या 3 इतकी आहे.
22) मुंजेवाडी येथील गट नंबर 104 मध्ये 84.72 हेक्टर गायरान क्षेत्र आहे. यातील 0.42 हेक्टर क्षेत्रावर अतिक्रमण आहे. यामध्ये बेकायदेशीर विनापरवाना बांधकामांची संख्या 25 इतकी आहे.
23) पिंपळगाव उंडा गावातील गट नंबर 135 मध्ये 15.12 हेक्टर गायरान क्षेत्र आहे. यातील 0.17 हेक्टर क्षेत्रावर अतिक्रमण आहे. यामध्ये बेकायदेशीर विनापरवाना बांधकामांची संख्या 17 इतकी आहे.
24) वाघा येथील गट नंबर 313, 7 मध्ये 7.40 हेक्टर गायरान क्षेत्र आहे. यातील 0.68 हेक्टर क्षेत्रावर अतिक्रमण आहे. यामध्ये बेकायदेशीर विनापरवाना बांधकामांची संख्या 42 इतकी आहे.
25) खर्डा शहरातील गट नंबर 1186/2, 920, 1141 मध्ये 52.52 हेक्टर गायरान क्षेत्र आहे. यातील 0.61 हेक्टर क्षेत्रावर अतिक्रमण आहे. यामध्ये बेकायदेशीर विनापरवाना बांधकामांची संख्या 41 इतकी आहे.
26) दौंडवाडी गावातील गट नंबर 171 मध्ये 43.59 हेक्टर गायरान क्षेत्र आहे. यातील 0.29 हेक्टर क्षेत्रावर अतिक्रमण आहे. यामध्ये बेकायदेशीर विनापरवाना बांधकामांची संख्या 27 इतकी आहे.
27) सोनेगावमधील गट नंबर 186/1 मध्ये 20.03 हेक्टर गायरान क्षेत्र आहे. यातील 0.96 हेक्टर क्षेत्रावर अतिक्रमण आहे. यामध्ये बेकायदेशीर विनापरवाना बांधकामांची संख्या 96 इतकी आहे.
28) धनेगाव येथील गट नंबर 4, 11, 16 मध्ये 28.91 हेक्टर गायरान क्षेत्र आहे. यातील 0.18 हेक्टर क्षेत्रावर अतिक्रमण आहे. यामध्ये बेकायदेशीर विनापरवाना बांधकामांची संख्या 81 इतकी आहे.
29) जवळके गावातील गत नंबर 26 मध्ये 52.14 हेक्टर गायरान क्षेत्र आहे. यातील 2.19 हेक्टर क्षेत्रावर अतिक्रमण आहे. यामध्ये बेकायदेशीर विनापरवाना बांधकामांची संख्या 219 इतकी आहे.
30) जातेगाव मधील गट नंबर 675 मध्ये 58.84 हेक्टर गायरान क्षेत्र आहे. यातील 0.02 हेक्टर क्षेत्रावर अतिक्रमण आहे. यामध्ये बेकायदेशीर विनापरवाना बांधकामांची संख्या 1 इतकी आहे.
31) नायगाव मधील गट नंबर 931 मध्ये 63 40 हेक्टर गायरान क्षेत्र आहे. यातील 0.33 हेक्टर क्षेत्रावर अतिक्रमण आहे. यामध्ये बेकायदेशीर विनापरवाना बांधकामांची संख्या 33 इतकी आहे.
32) नाहुली गावातील गट नंबर 332/1 मध्ये 4.27 हेक्टर गायरान क्षेत्र आहे. यातील 0.4 हेक्टर क्षेत्रावर अतिक्रमण आहे. यामध्ये बेकायदेशीर विनापरवाना बांधकामांची संख्या 40 इतकी आहे.
33) देवदैठण गावातील गट नंबर 199/1 मध्ये 23.48 हेक्टर गायरान क्षेत्र आहे. यातील 0.17 हेक्टर क्षेत्रावर अतिक्रमण आहे. यामध्ये बेकायदेशीर विनापरवाना बांधकामांची संख्या 17 इतकी आहे.
34) पिंपळगाव आळवा येथील गट नंबर 2 मध्ये 3.95 हेक्टर गायरान क्षेत्र आहे.यातील 1.13 हेक्टर क्षेत्रावर अतिक्रमण आहे.यामध्ये बेकायदेशीर विनापरवाना बांधकामांची संख्या 74 इतकी आहे.
35) लोणी गावातील गट नंबर 276 मध्ये 9.23 हेक्टर गायरान क्षेत्र आहे. यातील 0.79 हेक्टर क्षेत्रावर अतिक्रमण आहे. यामध्ये बेकायदेशीर विनापरवाना बांधकामांची संख्या 77 इतकी आहे.
36) वाकी गावातील गट नंबर 46 मध्ये 36.43 हेक्टर गायरान क्षेत्र आहे. यातील 0.13 हेक्टर क्षेत्रावर अतिक्रमण आहे. यामध्ये बेकायदेशीर विनापरवाना बांधकामांची संख्या 13 इतकी आहे.
37) जायभायवाडी गावातील गट नंबर 31 मध्ये 6.77 हेक्टर गायरान क्षेत्र आहे. यातील 0.46 हेक्टर क्षेत्रावर अतिक्रमण आहे. यामध्ये बेकायदेशीर विनापरवाना बांधकामांची संख्या 60 इतकी आहे.
सुचना : वरिल माहिती प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या प्राथमिक माहितीवर अधारीत आहे. या माहितीत संख्येत आणखीन वाढ होऊ शकते. प्रशासनाकडून ताजी माहिती प्राप्त होताच ती माहिती या ठिकाणी अपडेट केली जाईल.