जामखेड टाईम्स वृत्तसेवा : गारपीट व अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानभरपाईचा निधी मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. लवकरच कर्जत – जामखेड मतदारसंघातील 678 शेतकर्यांना 40 लाख रूपयांचे नुकसान भरपाई अनुदान मिळणार आहे अशी माहिती आमदार रोहित पवार यांनी दिली. (678 farmers in Karjat Jamkhed will get compensation of Rs 40 lakh)
डिसेंबर 2019 व जानेवारी 2020 या कालावधीत कर्जत – जामखेड मतदारसंघात गारपीट व अवेळी झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले होते. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळणे आवश्यक होते.यासाठी कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आ.रोहित पवार यांनी नुकसानग्रस्त भागाची अधिकाऱ्यांसह बांधावर जाऊन पाहणी केली होती.तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले होते आणि याबाबत पाठपुरावाही केला होता.आता कर्जत तालुक्यासाठी तिसऱ्या टप्प्यातील मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग होणार असल्याची माहिती आ. रोहित पवार यांनी दिली. (678 farmers in Karjat Jamkhed will get compensation of Rs 40 lakh)
कर्जत तालुक्यातील 10 गावांतील 287 शेतकऱ्यांना 18 लाख 11 हजार रुपयांचे अनुदान तर जामखेड तालुक्यातील 19 गावातील 391 शेतकऱ्यांना 27 लक्ष 02 हजार रुपयांचे अनुदान प्राप्त झाले असुन ही रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात येणार आहे अशी माहिती आमदार रोहित पवार यांनी दिली. (678 farmers in Karjat Jamkhed will get compensation of Rs 40 lakh)