घोडेगावमध्ये आधार नोंदणी व दुरुस्ती विशेष शिबीर संपन्न | Aadhar registration and repair special camp held in Ghodegaon
जामखेड टाईम्स वृत्तसेवा : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून घोडेगाव ग्रामपंचायत कार्यालयात आधार नोंदणी व दुरुस्ती विशेष शिबीराचे उपविभागीय डाक निरीक्षक अमित देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी घोडेगाव येथील सरपंच शरद जगताप होते. कार्यक्रमाची सुरवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन उपसरपंच शमशाद शौकत मुलाणे यांचे हस्ते करून करण्यात आली.
घोडेगाव व परिसरातील अनेक लोकांनी दिवसभर चाललेल्या या आधार नोंदणी व दुरुस्ती शिबीराचा लाभ घेतला. यावेळी नवीन आधार नोंदणी,आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक करणे, नावात बदल व सर्व दुरुस्तीचे कामे यावेळी करण्यात आली, तसेच यावेळी डाक विभागाच्या विविध योजनांची माहिती ग्रामस्थांनी घेतली.
यावेळी घोडेगाव येथील पोस्टमास्तर सुनील हंबीरराव, सामाजिक कार्यकर्ते विशाल गव्हाळे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष निलेश कचरे, उपाध्यक्ष महादेव जगताप, डाक विभागातील आधारचे प्रणाली प्रबंधक जगदीश पेन्लेवाड, डाक आवेक्षक सुनील धस, पोस्टमन राजकुमार कुलकर्णी, मोहा पोस्टमास्तर संतोष औचारे, निमगाव डाकू पोस्टमास्तर धनराज भोसले आदि उपस्थित होते.
या कामी जामखेडचे पोस्टमास्तर अविनाश ओतारी, नान्नजचे पोस्टमास्तर बळी जायभाय, घोडेगाव ग्रामपंचायत, घोडेगाव ग्रामस्थ आदींचे सहकार्य लाभले