जामखेड टाइम्स वृत्तसेवा : जामखेड पंचायत समितीच्या शिक्षण विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय विविध गुणदर्शन व सांस्कृतिक कार्यक्रम स्पर्धेमध्ये जामखेड तालुक्यातील चोंडी येथील अंजली संतोष कुरडुले या विद्यार्थीनीने ‘गोष्ट/कथा सादरीकरण’ या विभागात (कुमार गट) तालुकास्तरीय ‘प्रथम क्रमांक’ पटकावला. अंजली हीच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून तिचे कौतुक होत आहे.
अंजली कुरडुले ही चोंडी येथील प्राथमिक शाळेत शिक्षण घेत आहे. ती आमदार प्रा.राम शिंदे यांचे स्वीय सहाय्यक संतोष कुरडुले यांची कन्या आहे. शिक्षण विभागाकडून नुकत्याच घेण्यात आलेल्या विविध गुणदर्शन व सांस्कृतिक कार्यक्रम या तालुकास्तरीय स्पर्धेत अंजली हिने सहभाग घेतला होता.
कुमार गटातून तीने ‘गोष्ट/कथा सादरीकरण’ या तालुकास्तरीय स्पर्धेत सहभाग घेतला होता. त्यात तीने प्रथम क्रमांक पटकावला. तत्पूर्वी हळगाव केंद्रातून अंजली हिची तालुकास्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली होती.
चोंडी शाळेचे मुख्याध्यापक सय्यद सर, नवसरे सर, जवणे मॅडम, शेख सर, नाकाडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली अंजली कुरडूले हिने गोष्ट/कथा सादरीकरण या तालुकास्तरीय स्पर्धेची तयारी केली होती. अंजली हिने शिक्षक व पालकांनी दाखवलेल्या विश्वासाला तडा जाऊ न देता तालुकास्तरीय स्तरीय स्पर्धेत पहिला क्रमांक पटकावत चोंडी प्राथमिक शाळेचे नाव उज्ज्वल केले. अंजली कुरडुले हिने मिळवलेल्या या घवघवीत यशाबद्दल तिचे आमदार प्रा राम शिंदे, माजी सभापती आशाताई राम शिंदे, गटविकास अधिकारी शुभम जाधव, गटशिक्षण अधिकारी खैरे सह आदींनी अभिनंदन केले आहे. अंजली हिच्यावर विविध स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.