Jamkhed | आष्टी पाटोदा बंद झाले आता जामखेडला धोका

रविवारी जामखेड तालुक्यात १८ नवे कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले

जामखेड टाईम्स वृत्तसेवा, दि १७ जुलै : जामखेड शेजारील आष्टी व पाटोदा (Ashti Patoda is closed) तालुक्यात कोरोनाचा उद्रेक वाढल्याने हे तालुके बंद झाले आहेत. या भागातील व्यवहार सकाळी ०७ ते १२: ३० पर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय बीड जिल्हा प्रशासनाने घेतला आहे.आता या भागातील नागरिक जामखेड (Jamkhed) शहरात येण्याचा धोका वाढला आहे. जामखेड तालुक्यात मागील काही दिवसांपासून कोरानाचे रुग्ण वाढत असल्याने जामखेडची वाटचाल आष्टी पाटोद्याच्या दिशेने सुरु झाली आहे. (The journey of Jamkhed started towards Ashti Patoda)

जामखेड (Jamkhed) तालुक्यात कोरोनाचा उद्रेक सुरूच आहे मागील दोन दिवसांत कोरोनाने शतक झळकावल्यानंतर आज रविवारी जामखेड तालुक्यात १८ नवे कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले आहे. जामखेड तालुक्यातील कोरोनाचा वाढता उद्रेक चिंताजनक बनत चालला आहे.

जामखेड (Jamkhed) तालुका आरोग्य विभागाने रविवारी दिवसभरात ६९२ नागरिकांच्या रॅपिड अँटीजेन चाचण्या केल्या यामध्ये १५ जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.तर जिल्हा रूग्णालयाकडून प्राप्त झालेल्या RTPCR कोरोना तपासणीत ०३ जण कोरोना बाधित आढळून आले आहेत. रविवारी आढळून आलेल्या १८ नव्या कोरोनाबाधितांमध्ये जामखेड ०३, वाघा ०५, नान्नज ०१, फक्राबाद ०१, तेलंगशी ०२, हापटेवाडी ०६ , या रूग्णांचा समावेश आहे. आज दिवसभरात आरोग्य विभागाने ४०३ नागरिकांचे RTPCR स्वॅबनमुने कोरोना तपासणीसाठी जिल्हा रूग्णालयात पाठवले आहेत.

जामखेड(Jamkhed) हा तालुका मराठवाड्याच्या सरहद्दीवर आहे.जामखेड शेजारील आष्टी व पाटोदा हे बीड जिल्ह्यातील तालुका कोरोना हाॅटस्पाॅट बनू लागले आहेत. या भागात कोरोनाचा उद्रेक खंडीत करण्यासाठी बीड जिल्हा प्रशासनाने कडक उपाययोजना हाती घेतल्या आहेत. उद्या सोमवारपासून या भागातील दैनंदिन व्यवहार (अत्यावश्यक सेवा वगळता) सकाळी ०७ ते १२: ३० या वेळात सुरू असणार आहेत. या भागातील नागरिकांचा ऐरवी जामखेडशी नित्याचा संपर्क असतो. आता तर दुपार नंतरच्या मोकळ्या वेळात या भागातील नागरिकांचा जामखेड शहरातील वावर मोठ्या प्रमाणावर वाढू शकतो.

जामखेड (Jamkhed) तालुक्यात कोरोनाचा महाविध्वंस पुन्हा वेग पकडू नये याकरिता तालुका प्रशासन व जामखेड नगरपरिषदेने आता कठोर उपाययोजना हाती घेण्याची आवश्यकता आहे.