Ramai Awas Yojana 2023 : रमाई आवास योजनेंतर्गत घरकुलांसाठी लाभार्थ्यांनी परिपूर्ण प्रस्ताव सादर करावेत – बीडीओ प्रकाश पोळ
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : अनुसूचित जातीच्या नागरिकांना राहण्यासाठी पक्का निवारा असावा यासाठी महाराष्ट्र सरकारकडून (Maharashtra Government) रमाई आवास योजना (Ramai Aawa Yojana 2023) राबवली जाते. जामखेड तालुक्यात ही योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी जामखेड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रकाश पोळ (BDO Prakash Pol) यांनी पुढाकार घेतला आहे.
जामखेड तालुक्यात रमाई आवास योजना राबविण्यासाठी शासनाने 479 घरकुलांचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. जामखेड तालुक्यातील अनुसूचित जातीच्या नागरिकांनी घरकुलांचे परिपूर्ण प्रस्ताव ग्रामपंचायतींमार्फत सादर करण्याचे अवाहन करण्यात आले आहे. प्रथम प्रस्ताव सादर करणाऱ्या लाभार्थ्यांना प्रथम प्राधान्य दिले जाणार आहे.
रमाई आवास योजना निकष खालीलप्रमाणे – Ramai Awas Yojana 2023 Criteria
- लाभार्थी अनुसूचित जातीचा असावा.
- लाभार्थी ग्रामपंचायत चा रहिवासी असावा.
- यापूर्वी कोणत्याही योजनेतून घरकुल योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
- लाभार्थ्याचे उत्पन्न 1.20 लाख रुपये च्या आत असावे.
- घरकुल बांधण्यासाठी लाभार्थ्याकडे स्वतःची जागा असावी.
रमाई आवास योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे खालीलप्रमाणे – Ramai Awas Yojana 2023 Required Documents
- घरकुल मागणी अर्ज.
- जातीचा दाखला (प्रांत यांचा).
- रहिवासी दाखला.
- रेशन कार्ड.
- जॉब कार्ड
- आधार कार्ड.
- बँक पासबुक.
- जागेचा उतारा.
- उत्पन्नाचा दाखला (तहसीलदार यांचा).
- लाभार्थी निवडीबाबत ग्रामसभा ठराव.
- ग्रामपंचायतचा कर थकीत नसल्याचे प्रमाणपत्र.
- यापूर्वी कोणत्या योजनेतून सदर लाभार्थ्यास लाभ दिल्या नसल्याचे ग्रामसेवक यांचे प्रमाणपत्र.