शिऊर ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपा नेते गौतम आण्णा उतेकरच किंग, भाजपने उडवला राष्ट्रवादीचा धुव्वा, शिऊरच्या सरपंचपदी गिरजा उतेकर विराजमान !
जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सत्तार शेख । राजकीयदृष्ट्या महत्वाच्या असलेल्या शिऊर ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपने राष्ट्रवादीचा धुव्वा उडवला. या निवडणुकीत भाजपा नेते तथा बाजार समितीचे सभापती गौतम आण्णा उतेकर हेच किंग ठरले. राष्ट्रवादीला या निवडणुकीत मानहानिकारक पराभवाला सामोर जावे लागले. त्यांना अवघ्या दोन जागांवर समाधान मानावे लागले. भाजपचे जेष्ठ नेते तथा बाजार समितीचे सभापती गौतम आण्णा उत्तेकर यांच्या नेतृत्वावर शिऊरकरांनी पुन्हा एकदा विश्वास दाखवला.
शिऊर ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंचपदासाठी तिरंगी सामना रंगला होता. या निवडणुकीत बाजार समितीचे सभापती गौतम उतेकर यांच्या सौभाग्यवती गिरजा उतेकर यांनी दोघा विरोधी उमेदवारांचा तब्बल 250 पेक्षा अधिक मतांनी दारूण पराभव केला. उतेकर यांच्या लाटेत विरोधक भुईसपाट झाले. या निवडणुकीत उतेकर गटाचे 7 सदस्य विजयी झाले.अर्ज मागे घेण्याच्या दिवशी याच गटाच्या दोन जागा बिनविरोध झाल्या होत्या. शिऊरमधील जनतेने पुन्हा एकदा आमदार प्रा राम शिंदे यांना साथ दिली. निकालानंतर भाजपने जामखेड शहरात जोरदार जल्लोष केला.
यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष अजय काशिद, रविंद्र सुरवसे, पांडुरंग उबाळे, सोमनाथ पाचरणे, सोमनाथ राळेभात, उदयसिंग पवार पाटील, संपत राळेभात, डाॅ अल्ताफ शेख, प्रविण चोरडिया, आप्पासाहेब ढगे, चेअरमन अशोक महारनवर सह आदी पदाधिकाऱ्यांकडून यावेळी शिऊर ग्रामपंचायतच्या नवनिर्वाचित सदस्यांसह भाजपा नेते गौतम उतेकर यांचा सत्कार करण्यात आला.
शिऊर ग्रामपंचायत निवडणूक निकाल खालीलप्रमाणे
सरपंचपदाचा निकाल
1) गिरजा गौतम उतेकर – 947 (विजयी)
2) रतन विठ्ठल चव्हाण – 695
3) स्वाती सिध्देश्वर लटके – 449
4) नोटा – 18
प्रभाग 1 : अनुसूचित जाती
1) नरेंद्र आण्णा पाचारे – 605 (विजयी)
2) अजिनाथ भिकू समुद्र – 228
3) नोटा – 16
प्रभाग 1 : सर्वसाधारण
1) आजिनाथ बन्सी निकम – 558 (विजयी)
2)आकाश अभिमान निकम – 283
3) नोटा – 8
प्रभाग 1 : सर्वसाधारण स्त्री
1) आशाबाई भास्कर तनपुरे – 347
2) प्रियंका भाऊसाहेब तनपुरे- 500 (विजयी)
3) नोटा – 2
प्रभाग 2 : नागरिकांचा मागास प्रवर्ग
1) सेवक शहाजी फाळके – 472 (विजयी)
2) युवराज राजाराम इंगवले – 96
3) नोटा – 17
प्रभाग तीन : सर्वसाधारण
1) बदाम बाबासाहेब निंबाळकर – 402 (विजयी)
2) बाप्पुसाहेब प्रल्हाद माने – 266
3) नोटा – 7
प्रभाग तीन : सर्वसाधारण स्त्री
1) उषा नारायण निकम – 492 (विजयी)
2) राजश्री दादा लटके – 366 (विजयी)
3) सोनाली अरूण समुद्र – 257
4) साखरबाई साहेबराव कदम – 205
5) नोटा – 21
6) नोटा – 09
शिऊर ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपा नेते तथा बाजार समितीचे सभापती गौतम उतेकर यांच्या गटाचे विजयी उमेदवार खालील प्रमाणे
1) गिरजा गौतम उतेकर (सरपंच)
2) आजिनाथ बन्सी निकम
3) प्रियंका भाऊसाहेब तनपुरे
4) सेवक शहाजी फाळके
5) उषा नारायण निकम
6)राजश्री दादा लटके
7) शोभा बाप्पू पिंपरे (बिनविरोध)
8) शितल अशोक इंगवले (बिनविरोध)
विरोधी गटाचे विजयी उमेदवार खालीलप्रमाणे
1) बदाम निंबाळकर
2) नरेंद्र पाचारे