जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सत्तार शेख। रत्नापूर ग्रामपंचायत निवडणुकीत आमदार राम शिंदे यांच्या मार्गदर्शनाखालील युवा क्रांती स्थानिक ग्रामविकास आघाडी अर्थात भाजपच्या पॅनलचा विजय निश्चित आहे. आमदार राम शिंदे हे मंत्री असताना त्यांनी बंधाऱ्यांसाठी दिलेल्या भरघोस निधीमुळे रत्नापूरात जलक्रांती झाली. शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघाला आहे. शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे. यापुढील काळात आमदार प्रा राम शिंदे, खासदार डॉ.सुजय विखे-पाटील यांच्या माध्यमांतून रत्नापुर – सांगवी -मुसलमानवाडीचा सर्वांगीण विकास केला जाणार आहे. जनतेचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळत असल्याने या निवडणुकीत आमच्या पॅनलचा विजय निश्चित आहे, असे प्रतिपादन सुहास वारे यांनी केले.
संपुर्ण जामखेड तालुक्याचे लक्ष लागलेल्या रत्नापुर ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप विरूध्द राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय वारे असा थेेट सामना रंगला आहे. या निवडणुकीत भाजपकडून माजी सरपंच दादासाहेब (बाप्पू) वारे यांनी युवा क्रांती स्थानिक ग्रामविकास आघाडीच्या माध्यमांतून राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय वारे यांच्या पॅनलसमोर तगडे अव्हान निर्माण केले आहे.
सोमवारी युवा क्रांती स्थानिक ग्रामविकास आघाडीच्या प्रचाराचा दणक्यात शुभारंभ झाला.या पॅनलने जोरदार शक्तीप्रदर्शन केल्याने विरोधी गटाची हवा गुल झाली आहे. युवा क्रांती स्थानिक ग्रामविकास आघाडीने सोमवारी ग्रामदैवत रतनबिबी आणि श्री रत्नेश्वराला नारळ वाढवत प्रचाराचा शुभारंभ केला.आमदार प्रा राम शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर पॅनल निवडणुकीच्या मैदानात उतरला आहे.
या निवडणुकीत 10- 0 ने आमच्या पॅनलचा विजय होणार, असा दावा माजी सरपंच तथा पॅनल प्रमुख दादासाहेब वारे यांनी केला आहे. रत्नापुर ग्रामपंचायत निवडणुकीत सांगवी, मुसलमानवाडी आणि रत्नापुरचा समावेश आहे. या निवडणुकीसाठी 2100 च्या आसपास मतदार आहेत. प्रचाराचा नारळ फोडल्यानंतर सुहास वारे यांनी युवा क्रांती स्थानिक ग्रामविकास आघाडीची भूमिका मांडत विरोधकांचा जोरदार समाचार घेतला.
यावेळी बोलताना सुहास वारे म्हणाले की, निवडणुकीपूर्वी लढत अतितटीची होईल असे चिन्हे होती, आता ही निवडणुक एकतर्फी होण्याची जास्त शक्यता आहे. मागील निवडणुकीत भाजपचा पॅनल 10-0 ने विजयी झाला होता, आताही हीच परिस्थिती आहे. त्यामुळे गुलाल आमचाच पॅनल उधळणार आहे. मागच्या पाच वर्षात विद्यमान बाॅडीने जी काही कामे केली त्या कामांचे फळ आमच्या उमेदवारांना मिळत आहे. जनतेचा प्रतिसाद आमच्या पॅनलला वाढला आहे, असे सुहास वारे म्हणाले.
वारे पुढे म्हणाले की, मागच्या पाच वर्षांमध्ये पेव्हिंग ब्लाॅकचे कामे असतील, दलित वस्तीवरील कामं असतील, घरकुलांची कामं असतील, पाण्याचा कामं असतील, रस्त्यांची कामं असतील, जलजीवन विस्ताराची कामं असतील, ही सर्व कामं केल्यामुळे नागरिकांचा आणि सर्व मतदारांचा युवा क्रांती स्थानिक ग्रामविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना पाठिंबा वाढला आहे.सगळीकडे भाजपची सत्ता आहे.आम्हाला खासदार डॉ.सुजय विखे-पाटील आणि आमदार राम शिंदे यांनी अश्वासन दिलं आहे की, गावपातळीवरील विकास कामांसाठी भरीव निधी दिला जाईल. तुमचे कुठलेही काम रखडणार नाही असा शब्द दोन्ही नेत्यांनी दिला आहे. त्यामुळे आमच्या पॅनलचा विजय निश्चित आहे.
सुहास वारे पुढे म्हणाले, रत्नापुर ग्रामपंचायत निवडणुकीत दोन पॅनल समोरासमोर आहेत. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय वारे आणि सभापती सुर्यकांत मोरे या राष्ट्रवादीच्या दोन मोठ्या नेत्यांमध्ये जागा वाटपात एकमत न झाल्याने राष्ट्रवादीचे नेते सुर्यकांत मोरे यांनी तटस्थ राहण्याची भूमिका घेतली आहे. यामुळे आमच्या पॅनलचा विजय हा पुर्णपणे निश्चित आहे. आणि त्यात कुठलाही बदल होणार नाही.मी सगळ्यांना अवाहन करतो की, मतदानाला आणि विजयी मिरवणुकीला सर्वांनी यावं, आणि हा जल्लोष साजरा करावा, असे वारे म्हणाले.
सुहास वारे पुढे म्हणाले, मागच्या 20 वर्षाचा रत्नापुर गावाचा इतिहास पाहिला तर प्रत्येक वेळी नविन पक्षाला, नेतृत्वाला गावपातळीवरती संधी मिळाली आहे.राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय वारे यांनी यंदा आपल्या पॅनलकडून जे उमेदवार निवडणुकीला उभे केले आहेत ते 2012 ते 2017 या काळात सत्ताधारी होते, त्यांनी त्या पाच वर्षात काय कारभार केला आणि काय गुण उधळलेत हे गावाला आणि संपूर्ण तालुक्याला माहित आहे. त्यांची काम करण्याची पध्दत लोकांना माहित आहे. त्या पध्दतीमुळेच लोकांचा आम्हाला पाठिंबा वाढत आहे.
राहिला विषय दत्तात्रय वारे यांचा, ते राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष आहेत, ते तालुक्याचे मोठे नेते आहेत, त्यांनी तालुका पातळीवर मोठं व्हावं, त्यासाठी आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत, पण गावपातळीवर चुकीचे कामं करण्यासाठी आम्ही त्यांच्या पॅनलला कोणीही सहकार्य करणार नाही, असेही वारे यांनी ठणकावले.
मागील पाच वर्षांत आमदार प्रा राम शिंदे साहेबांच्या मंत्रिपदाच्या काळात गावपातळीवर भरपुर काम झाली आहेत. 3 कोटी रूपयांची तीन बंधारे झाली आहेत, त्यामुळे गावामध्ये आज पाण्याची टंचाई नाही. गाव सुजलाम सुफलाम झालेलं आहे. याची जाणीव संपुर्ण गावकऱ्यांना असल्यामुळे गाव एकमताने भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखालील पॅनलला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत आसल्याचे दिसून येत आहे, असेही वारे यांनी स्पष्ट केले.
मागील पाच वर्षांमध्ये भाजपाकडे ग्रामपंचायतची सत्ता होती. याकाळ्त भाजपने खूप चांगल्या पध्दतीने काम केलं आहे, घरकुल असो, रस्ते असो, विज प्रश्न असो,तसेच पाण्याचे प्रश्न पुर्णपणे संपवले आहेत. पिण्याचं स्वच्छ पाणी 24 तास गावाला उपलब्ध करून दिले आहे. तसेच अनेक कामं चालू आहेत. तसेच अनेक कामं आमदार प्रा राम शिंदे साहेबांच्या माध्यमांतून मार्गी लागणार आहेत, त्यामुळे नागरिकांचा आमच्या पॅनलला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे सुहास वारे यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, सोमवारी सकाळी युवा क्रांती स्थानिक ग्रामविकास आघाडीच्या प्रचाराचा शुभारंभ झाला. यावेळी पाटोदा सेवा सोसायटीचे चेअरमन अशोक महारनवर, भाजपा युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष दत्तात्रय गिरी, सोमनाथ दरे, ॲड बिपीन वारे, शरद मोरे, सुनिल मोरे, संपत वारे, नाना मोरे, चित्रांगद वारे, महादेव वारे, गणेश गंभीरे, अशोक जाधव, गोरख राजगुरु, वस्ताद पिंटू माने, बाळासाहेब मोरे, तात्या कदम, अनिल ढवळे, बाळासाहेब ढवळे, संजय वारे, दादासाहेब कदम, अन्सार पठाण, पांडुरंग मोरे, विकास मोरे, उमेश मोरे, राजेंद्र वारे सह असंख्य कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.