घोडेगावमध्ये भाजपचा गड उध्वस्त ; राष्ट्रवादीने केला ग्रामपंचायतवर कब्जा (BJP’s fort destroyed in Ghodegaon; The NCP captured the Gram Panchayat)
जामखेड टाईम्स वृत्तसेवा: जामखेड तालुक्यातील घोडेगाव ग्रामपंचायतमध्ये यंदा प्रस्तापितांना जनतेने नाकारले. गेल्या वीस ते पंचवीस वर्षांपासुन सत्तेत असलेल्या भाजपला नव्या दमाच्या तरूणांनी धोबीपछाड दिलाय. यंदा घोडेगाव ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीने सत्ता स्थापन केली. सरपंचपदी शरद जगताप तर उपसरपंचपदी शमशाद मुलानी यांची निवड करण्यात आली आहे. (BJP’s fort destroyed in Ghodegaon; The NCP captured the Gram Panchayat)
यंदा घोडेगाव ग्रामपंचायत निवडणुकीत तिरंगी सामना रंगला होता. प्रस्थापितांच्या गटाला अवघ्या चार जागा मिळाल्या तर नव्या दमाच्या परिवर्तन पॅनलने पाच जागा जिंकत घोडेगावमध्ये इतिहास घडवला. नुकत्याच पार पडलेल्या सरपंच उपसरपंचपदाच्या निवडणुकीत शरद जगताप या युवा कार्यकर्त्याची सरपंचपदी तर शमशाद शौकत मुलानी या महिलेची उपसरपंचपदी निवड झाली आहे. यावेळी गणेश रावण, चैतन्या किसन भानवसे, रेणूका प्रभू गवळी या ग्रामपंचायत सदस्यांनी नव्या पदाधिकार्यांचा सत्कार केला. सरपंच व उपसरपंचपदाच्या निवडी जाहीर होताच परिवर्तन पॅनलच्या अर्थात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी व गुलालाची उधळण करत विजयोत्सव साजरा केला.
घोडेगाव ग्रामपंचायतमध्ये सत्तेवर आलेल्या नव्या दमाच्या कारभार्यांना जालींदर कल्याण भोंडवे, ताहेरअली पटेल , पप्पू शेख, जानमोहमंद सय्यद, नाना पाटील, लक्ष्मण भांगे, गणेश सुरवसे, बाळू कांबळे, हरि दिवटे, भिमराव रासकर, आण्णा रावण, दत्ता रावण, महादेव तळेकर सर, जावेद पटेल, सलिम शेख, प्रभू गवळी, दादा रासकर, गणेश धारूरकर, विनोद जगताप महादेव जगताप, विठ्ठल भोंडवे, विशाल गव्हाळे, पै बाबूराव भोंडवे, नवनाथ रासकर, जुनेद पटेल,भिमराव भोंडवे, जहांगिर सय्यद कृष्णा राऊत, मल्हारी रासकर, किसन आडाल, दत्ता कचरे, बायडाबाई भोंडवे, रूक्मिणी दिवटे, शारदा भांगे, यमुना भानुसे, वैशाली गवळी सह आदींचे मार्गदर्शन लाभले. जनतेने प्रस्थापितांना धडा शिकवण्यासाठी यंदाची निवडणुक घेतली होती. जनतेने यंदा घोडेगावची सत्ता तरूणांच्या हाती सत्ता सोपवलीय. नव्या दमाचे नवे कारभारी घोडेगावला विकासाच्या नव्या उंचीवर घेऊन जातील अशा विश्वास नागरिक बोलून दाखवत आहेत.