ब्रेकिंग न्यूज: अरणगावमध्ये बिबट्या पडला विहिरीत, आमदार प्रा राम शिंदे यांनी वनविभागाला दिले महत्वाचे आदेश !
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : जामखेड तालुक्यातील अरणगाव येथील एका विहीरीत बिबट्या पडल्याची घटना आज उघडकीस आली आहे. अरणगावात बिबट्या आढळून आल्याने जामखेड तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.
जामखेड तालुक्यातील अरणगाव येथे एका विहीरीत बिबट्या पाण्यात पडला आहे. अरणगाव ग्रामपंचायतचे सदस्य तात्याराम निगुडे यांच्या विहीरीत बिबट्या पडल्याची घटना उघडकीस आली आहे. अरणगावचे सरपंच अंकुश शिंदे यांनी तातडीने या घटनेची माहिती आमदार प्रा.राम शिंदे यांना कळवली. आमदार.प्रा.राम शिंदे यांनी तातडीने वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून सदर बिबट्या विहिरीतून बाहेर काढण्यासाठी पिंजरा लावण्याचे आदेश दिले आहेत.
आमदार प्रा.राम शिंदे यांच्या आदेशानुसार वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी तातडीने अरणगावला रवाना झाले आहेत. तात्याराम निगुडे यांच्या विहीरीत बिबट्या पडला असल्याची माहिती वार्या सारखी परिसरात पसरली. बिबट्याला पाहण्यासाठी विहीर परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाली आहे.