जामखेड : हळगाव कृषि महाविद्यालयात चैत्रपालवी २०२५ क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न, तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी पटकावले अव्वल स्थान
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : हळगाव येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय कृषि महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन नुकतेच मोठ्या उत्साहात पार पडले. या स्नेहसंमेलन निमित्त महाविद्यालयात विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये कृषि पदवीतील तृतीय वर्षाच्या खेळाडूंनी सर्व सांघिक स्पर्धांमध्ये विजयी होत अव्वल स्थान पटकावले तर द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी क्रमांक पटकावला.

जामखेड तालुक्यातील हळगाव येथील शासकीय कृषि महाविद्यालयात चैत्रपालवी २०२५ निमित्त क्रीडा आविष्कार स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली. सांघिक खेळांमध्ये कबड्डी, खो-खो, हॉलीबॉल, फुटबॉल, क्रिकेट, रस्सीखेच तर वैयक्तिक खेळांमध्ये बॅडमिंटन, टेबल टेनिस, कॅरम, बुद्धिबळ, धावण्याची शर्यत, भालाफेक, थाळीफेक, गोळाफेक, चित्रकला, रांगोळी, वक्तृत्व, निबंध अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.

वैयक्तिक व सांघिक स्पर्धांमध्ये विजयी झालेल्या प्रथम, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ वर्षाच्या २८८ विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तृतीय वर्षातील विद्यार्थी सौरभ कारंडे याने सर्वोत्कृष्ट खेळाडूचा किताब जिंकला.

क्रीडा स्पर्धाच्या आयोजनामध्ये प्रभारी शारीरिक शिक्षण निर्देशक डॉ. निलेश लांडे यांनी अथक परिश्रम घेतले. पंच व परीक्षक म्हणून डॉ. प्रेरणा भोसले, डॉ. गोकुळ वामन, प्रा. पोपट पवार, डॉ. विवेकानंद कुलकर्णी, डॉ. मनोज गुड, डॉ. उत्कर्षा गवारे, डॉ. निकिता धाडगे, डॉ. महेश निकम, डॉ. अंबादास मेहेत्रे, प्रा. अर्चना महाजन, डॉ. किरण चौधरी, डॉ. अनिकेत गायकवाड, डॉ. प्रणाली ठाकरे, महादू शिंदे, शिक्षकेतर कर्मचारी प्रदीप धारेकर, सुरेश माकरे, संभाजी ठवाळ यांनी काम पाहिले. सदर स्पर्धेसाठी संजय आढाव, किरण अडसुर, शशी कांबळे, संजय सोनवणे, अनिकेत कुंभार, मोबिन नदाफ, अनिकेत मंडलिक, अनिता पुराणे, गंगाराम रंधवे यांनी मोलाचे सहकार्य केले.

सदरच्या स्पर्धा यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. अनिल काळे यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थी परिषद उपाध्यक्ष डॉ. दत्तात्रय सोनवणे, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. विवेकानंद कुलकर्णी तसेच इतर प्राध्यापक आणि विद्यार्थी परिषदेचे सभापती अनिकेत मिंड, संयोजक क्रीडा समिती सुमित भुजबळ, सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.
