Christmas 2024 : गॅलक्सी इंग्लिश स्कूलचे सर्वधर्म समभाव जपण्याचे कार्य कौतुकास्पद- डाॅ शोभा आरोळे

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : Christmas 2024 : शालेय विद्यार्थ्यांना बालवयात सण उत्सवांची माहिती अवगत व्हावी आणि त्यातून सर्वांप्रती आदर, प्रेम, स्नेह, सन्मान, ऐक्य, समानता आणि सर्वधर्म समभावाची वृती वृध्दींगत करण्याकरिता गॅलक्सी इंग्लिश स्कूलने हाती घेतलेले कार्य कौतुकास्पद असून भारत देशाला महासत्ताक बनवण्यासाठी सक्षम, गुणवत्तापूर्ण, दर्जेदार पिढी घडवण्यासाठी गॅलक्सी स्कुल घेत असलेली मेहनत प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन ग्रामीण आरोग्य प्रकल्पाच्या संचालिका डाॅ शोभाताई आरोळे (Dr Shobha Arole) यांनी केले.

Christmas 2024, Galaxy English School's work of maintaining equality among all religions is commendable - Dr Shobha Arole, jamkhed news today, Christmas is celebrated with enthusiasm at Galaxy English School,

जामखेड तालुक्यातील हळगाव येथे ज्ञानज्योती ग्रामीण विकास प्रतिष्ठान या संस्थेच्या गॅलक्सी इंग्लिश स्कूलमध्ये आज २४ डिसेंबर रोजी ख्रिसमस (नाताळ) सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी डाॅ शोभाताई आरोळे, सुलताना (भाभी) शेख, मधुकर वाळुंजकर अतुल खेत्रे, जामखेड टाइम्सचे संपादक सत्तार शेख, गॅलक्सी इंग्लिश स्कूलचे संस्थापक अध्यक्ष डाॅ अल्ताब शेख, संचालक इकबाल शेख, शकील शेख, प्राचार्या प्रियंका भोरे सह आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते. यावेळी आयोजित कार्यक्रमात डाॅ शोभाताई आरोळे बोलत होत्या.

Christmas 2024, Galaxy English School's work of maintaining equality among all religions is commendable - Dr Shobha Arole, jamkhed news today, Christmas is celebrated with enthusiasm at Galaxy English School,

ज्ञानज्योती ग्रामीण विकास प्रतिष्ठान या संस्थेच्या वतीने जामखेड तालुक्यातील हळगाव येथे गॅलक्सी इंग्लिश स्कूल चालवली जाते.दर्जेदार गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि विद्यार्थ्यांच्या कला गुणांना चालना देण्यासाठी सातत्याने नाविन्यपूर्ण प्रयोग राबवणारी प्रयोगशील शाळा अशी या शाळेची तालुक्यात ओळख आहे. या शाळेत दरवर्षी आषाढी वारीच्या काळात भव्यदिव्य दिंडी, ख्रिसमस सण साजरा केला जातो, रक्षाबंधन, रंगपंचमी, गोपाळकाला, महापुरूषांच्या जयंती पुण्यतिथी तसेच अनेक सामाजिक उपक्रम शाळेत राबवले जातात.

Christmas 2024, Galaxy English School's work of maintaining equality among all religions is commendable - Dr Shobha Arole, jamkhed news today, Christmas is celebrated with enthusiasm at Galaxy English School,

जगातील प्रतिष्ठीत असा रॅमन मॅगसेसे पुरस्कार प्राप्त असलेल्या जामखेड येथील आरोळे कुटुंबातील सदस्यांच्या उपस्थितीत ख्रिसमस हा सण गॅलक्सी स्कूलमध्ये दरवर्षी साजरा केला जातो. डाॅ शोभाताई आरोळे व त्यांच्या टीमने करोना काळात भरिव कार्य करत हजारो नागरिकांचे प्राण वाचवले, मानवतेच्या रक्षणाचे महान कार्य करणाऱ्या डाॅ शोभाताई आरोळे व सुलताना भाभी व त्यांच्या टीमचा गॅलक्सी इंग्लिश स्कूलचे अध्यक्ष डाॅ अल्ताब शेख यांनी यावेळी सन्मान करत गौरव केला.

Christmas 2024, Galaxy English School's work of maintaining equality among all religions is commendable - Dr Shobha Arole, jamkhed news today, Christmas is celebrated with enthusiasm at Galaxy English School,

आज २४ डिसेंबर रोजी दरवर्षी प्रमाणे गॅलक्सी इंग्लिश स्कूलमध्ये ख्रिसमस हा सण साजरा करण्यात आला. लहान मुलांचे विशेष आकर्षण असलेल्या सांताक्लाॅजच्या उपस्थितीत डाॅ शोभाताई आरोळे, सुलताना भाभी शेख यांच्या हस्ते केक कापून तसेच चिमुकल्यांना भेट वस्तूचे वाटप करत ख्रिसमस सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

Christmas 2024, Galaxy English School's work of maintaining equality among all religions is commendable - Dr Shobha Arole, jamkhed news today, Christmas is celebrated with enthusiasm at Galaxy English School,

यावेळी शाळेचे शिक्षक सचिन पुराणे, भोईटे सर, काजल सय्यद, अनिता शिंदे, सोनाली भांडवलकर, संयोजिता घायतडक, हसीना पठाण, धनश्री मोहळकर, ऋतुजा पागिरे, रूमाना पठाण तसेच शिक्षकेतर कर्मचारी इमाम पठाण, मंगेश हजारे, अशोक राऊत, मोहसीन सय्यद, सोमनाथ हजारे, राजु शेख, मंगेश शेळके, अविनाश पवार, विकास पवार सह आदी उपस्थित होते.