जवळा ग्रामपंचायतवर सर्वसामान्य जनतेची सत्ता, आमच्या विजयात कुठल्याच राजकीय पक्षाचा संबंध नाही – प्रशांत शिंदे

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : जवळा ग्रामपंचायत निवडणुकीत सर्वसामान्य गोरगरीब जनतेचा विजय झाला असून जनतेने जवळा ग्रामविकास पॅनलच्या हाती ग्रामपंचायतची सत्ता सोपवली आहे. आजच्या विजयात कुठल्याही राजकीय पक्षाचा संबंध नाही. जवळा गावातील सर्वसामान्य जनतेने धनशक्तीला पराभूत करत जनशक्तीने आपली ताकद दाखवून दिली आहे. आम्ही पाच वर्षांत केलेल्या विकास कामांना जनतेने साथ दिली अशी पहिली प्रतिक्रिया जवळा ग्रामविकास पॅनलचे नेते प्रशांत शिंदे यांनी विजयानंतर दिली आहे.

जामखेड तालुक्यातील सर्वात मोठ्या जवळा ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल सोमवारी जाहीर झाला. जवळा ग्रामपंचायतवर पुन्हा एकदा प्रशांत शिंदे यांनी आपला झेंडा फडकावला. जवळ्यातील जनतेने धनशक्तीला नाकारत प्रशांत शिंदे यांच्या हाती ग्रामपंचायतची सत्ता सोपवली. जवळा गावातील दिवंगत नेत्यांच्या पश्चात पहिल्यांदा झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या माध्यमांतून जवळा गावातील जनतेने प्रशांत शिंदे यांच्या रूपाने आपला नेता निवडला. प्रशांत शिंदे यांनी केलेल्या विकास कामांना जनतेने भरभरून साथ दिली. सरपंचपदी सुशील सुभाष आव्हाड हे 1003 मतांनी विजयी झाले. तर प्रशांत शिंदे यांच्या पत्नी शितल शिंदे ह्या सर्वाधिक 315 मतांनी सदस्यपदी विजयी झाल्या.

जवळा ग्रामपंचायत निवडणुकीत प्रशांत शिंदे यांच्या विरोधात सर्वपक्षीय नेते एकवटले होते. सर्वपक्षीय नेत्यांना जनतेने साफ नाकारले. प्रशांत शिंदे यांच्यासाठी जनतेने ही निवडणूक हातात घेतली होती हे आजच्या निकालातून स्पष्ट होत आहे. प्रशांत शिंदे यांच्यासाठी सर्वसामान्य जनतेने जवळा ग्रामविकास पॅनल निवडणुकीच्या रिंगणात उतरवला होता. या पॅनलने सरपंच पदाच्या उमेदवारासह सदस्यपदाच्या दहा जागा जिंकल्या. विरोधी शेतकरी ग्रामविकास आघाडीला अवघ्या पाच जागांवर समाधान मानावे लागले.

जवळा ग्रामपंचायत निवडणुकीतील विजयी उमेदवार खालील प्रमाणे

सरपंचपदाचे विजयी उमेदवार  – सुशिल सुभाष आव्हाड  ( 650 मतांनी विजयी )

सदस्यपदाचे विजयी उमेदवार खालील प्रमाणे

प्रभाग 1 – शेतकरी ग्रामविकास आघाडी – 2  विजयी

1) प्रदिप दळवी  ( 11 मतांनी विजयी)
2)  पांडूरंग शिंदे  (48 मतांनी विजयी)

जवळा ग्रामविकास पॅनल –  1

1) नंदा कल्याण आव्हाड  ( 2 मतांनी विजयी )

वार्ड 2- जवळा ग्रामविकास पॅनल –  3 उमेदवार विजयी

1) भाऊसाहेब  महारनवर  –  116 मतांनी विजयी
2) मंगल आव्हाड – 103 मतांनी विजयी
3) सोनाली वाळुंजकर  – 117 मतांनी विजयी

प्रभाग तीन : शेतकरी ग्रामविकास आघाडी  –  3 उमेदवार विजयी

किसन सरोदे  ( 72 मतांनी विजयी )
प्रशांत पवार  (29 मतांनी विजयी )
सिताबाई पठाडे (189 मतांनी विजयी )

प्रभाग 4 : जवळा ग्रामविकास पॅनल  3 उमेदवार विजयी

1) हरिदास हजारे –  67 मतांनी विजयी
2) सारिका रोडे – 1 मतांनी विजयी
3) कोल्हे जयश्री – 72 मतांनी विजयी

शेतकरी ग्रामविकास पराभूत उमेदवार

1) दशरथ हजारे गुरुजी 67 मतांनी पराभूत
2) पुजा उमेश रोडे – 1 मतांनी पराभूत
3) सोनाली गौतम कोल्हे – 72 मतांनी पराभूत

वार्ड 5 : जवळा ग्रामविकास पॅनल 3 उमेदवार विजयी

1) रफिक जमाल शेख – 251 मतांनी विजयी
2) शितल प्रशांत शिंदे –  315 मतांनी विजयी
3) राधिका मारूती हजारे – 204 मतांनी विजयी