Corona Patients in Jamkhed : जामखेड तालुक्यात कोरोनाने पार केले अर्धशतक
Corona Patients in Jamkhed | जामखेड टाईम्स वृत्तसेवा : जामखेड तालुक्यात सुसाट धावत असलेली कोरोनाची गाडी संथ होण्याचे नाव घेत नसल्याचे आता रोज येत असलेल्या आकडेवारीनुसार स्पष्ट होत आहे. गुरूवारी जामखेड तालुक्यात कोरोनाने अर्धशतक पार केले आहे. कोरोना रूग्णवाढीचा वेग वाढू लागल्याने तालुका आता डेंजर झोनच्या दिशेने वेगाने धावू लागला आहे.
Corona Patients in Jamkhed | जामखेड तालुक्यात गुरूवारी दिवसभरात ३० जुलै रोजी जामखेड तालुका आरोग्य विभागाने विक्रमी ९३२ नागरिकाच्या रॅपिड अँटीजेन चाचण्या केल्या यामध्ये जामखेड ०१, राजेवाडी ०१, रत्नापुर ०३, आपटी ०१, जवळके ०३, भुतवडा ०१, जवळा ०२ असे १२ जण नवे कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले आहेत.
Corona Patients in Jamkhed | जामखेड तालुका आरोग्य विभागाला आज ३० जुलै रोजी प्राप्त झालेल्या RTPCR कोरोना तपासणी अहवालात जामखेड ०७, फक्राबाद ०२, वंजारवाडी ०१, खर्डा ०२ , फाळकेवाडी ०६, तेलंगशी ०१, रत्नापुर ०३, सोनेगाव ०१, जवळके ०२, शिऊर ०१, वाघा ०१, साकत ०२, धोतरी ०१, राजेवाडी ०१, घोडेगाव ०१, डिसलेवाडी ०१, अरणगाव ०१, डोणगाव ०१, हापटेवाडी ०१, आनंदवाडी ०१, राजेवाडी ०१, सावरगाव ०२, माळेवाडी ०१, कुसडगाव ०२, धामणगाव ०१, असे एकुण ४४ रूग्ण तर बाहेरील तालुक्यातील ०५ असे मिळून ४९ रूग्ण आढळून आले आहेत.
Corona Patients in Jamkhed | जामखेड तालुक्यात गुरूवारी दिवसभरात एकुण ६१ रूग्ण आढळून आले आहेत यात बाहेरील तालुक्यातील ०५ रूग्णांचा समावेश आहे. आज आरोग्य विभागाने दिवसभरात एकुण ५१३ नागरिकांचे स्वॅबनमुने कोरोना तपासणीसाठी अहमदनगर जिल्हा रूग्णालयात पाठवले आहेत अशी माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ संजय वाघ यांनी दिली आहे.
Corona Patients in Jamkhed | कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता तालुका प्रशासनाकडून संपुर्ण तालुक्यात कारवाईची मोहीम हाती घेतली जात आहे अशी माहिती तालुका प्रशासनाने दिली आहे. नागरिकांनी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना सातत्याने सुरू ठेवाव्यात असे अवाहन आरोग्य विभागाने केले आहे.