जामखेड तालुक्यात कोरोना पुन्हा सक्रीय :दिवसभरात आढळले इतके नवे रुग्ण (Corona reactivated in Jamkhed taluka)
५२९ रॅपिड अँटीजेन चाचण्या करण्यात आल्या.
जामखेड टाईम्स वृत्तसेवा: जामखेड तालुक्यात थंडावलेला कोरोना पुन्हा सक्रीय होऊ लागला आहे. आज जामखेड तालुक्यात ५२९ रॅपिड अँटीजेन चाचण्या करण्यात आल्या त्यामध्ये २४ नवे कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले आहेत. तर दिवसभरात ४४३ RTPCR स्वॅबनमुने कोरोना तपासणीसाठी अहमदनगर जिल्हा रूग्णालयात पाठवण्यात आले आहेत.(Corona reactivated in Jamkhed taluka)
आज दिवसभरात करण्यात आलेल्या ५२९ रॅपिड अँटीजेन चाचण्यांमध्ये जामखेड ०४,साकत ०२, जवळा ०६, माहुली ०१, वंजारवाडी ०१, बोरला ०२, धोंडपारगाव ०१, आपटी ०४ या २४ रूग्णांचा समावेश आहे.तर ०५ कोरोना बाधित बाहेरील तालुक्यातील आहेत अशी माहिती वैद्यकीय अधीक्षक डाॅ संजय वाघ यांनी दिली.(Corona reactivated in Jamkhed taluka)