जामखेड टाईम्स वृत्तसेवा : जामखेड तालुक्यात आजपासूून (१५ ऑगस्ट) कोरोनाचे निर्बंध शिथिल झाले. बाजारपेठ आता उशिरापर्यंत सुरू राहणार आहे. एकिकडे निर्बंधातून सुटका मिळत असतानाच दुसरीकडे मात्र तालुक्यात कोरोनाचा कहर सुरूच आहे. रविवारी आलेली आकडेवारीही मोठी आहे. रविवारी आलेल्या आकडेेवारीनुसार हळगावमध्ये सर्वाधिक रूग्ण आढळून आले आहेत. (Corona turns to Halgaon)
रविवारी दिवसभरात आरोग्य विभागाने एकुण ५८९ नागरिकांच्या रॅपिड अँटीजेन चाचण्या केल्या यामध्ये हळगाव ०५ व नान्नज ०२ असे ०७ रूग्ण आढळून आले. (Corona turns to Halgaon)
तर RTPCR अहवालात जामखेड ०२, साकत ०१, नान्नज ०२, जामवाडी ०१, सोनेगाव ०१, खर्डा ०३, मोहरी ०१, डोणगाव ०३, हळगाव ०२, फाळकेवाडी ०१, सावरगाव ०१, पाटोदा ०१ असे एकुण १९ नवे कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले. (Corona turns to Halgaon)
रॅपिड व RTPCT अहवालात एकुण २६ रूग्ण आढळून आले आहेत. दरम्यान आरोग्य विभागाने दिवसभरात एकुण ५०१ नागरिकांचे RTPCR स्वॅबनमुने कोरोना तपासणीसाठी जिल्हा रूग्णालयात पाठवण्यात आले आहेत.