शनिवारी कोरोनाची चाल झाली मंद; दिवसभरात आढळले इतके रूग्ण (Corona’s move slowed on Saturday)
५६५ नागरिकांच्या रॅपिड अँटीजेन
जामखेड टाईम्स वृत्तसेवा : जामखेड तालुक्यात मागील तीन दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसु लागले होते. तीन दिवसांत ८७ नवीन कोरोनाबाधित रूग्ण आढळून आल्यानंतर आज शनिवारी कोरोनाची चाल काहीसी मंदावली आहे.(Corona’s move slowed on Saturday)
शनिवारी दिवसभरात ५६५ नागरिकांच्या रॅपिड अँटीजेन चाचण्यांमध्ये फक्त १० नवे कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले. तर RTPCR तपासणी अहवालात एकही रूग्ण आढळून आला नाही. आज दिवसभरात आरोग्य विभागाने ४४९ नागरिकांचे स्वॅबनमुने कोरोना तपासणीसाठी अहमदनगर जिल्हा रूग्णालयात पाठवले आहेत. तर आज आढळून आलेल्या नवीन कोरोनाबाधितांमध्ये जामखेड शहर ०१, साकत०३, सारोळा ०१,धोंडपारगाव ०१, चौंडी ०३, जवळा ०१ या दहा रूग्णांचा समावेश आहे.(Corona’s move slowed on Saturday)
जामखेड तालुक्यात कोरोनाच्या रूग्ण संख्येत चढ उतार होत आहे. मात्र अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात कोरोनाचा नवीन विषाणू आढळून आला आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर ही धोकाही घंटा आहे. नागरिकांनी कोरोना नियमाने पालन करणे आवश्यक आहे.(Corona’s move slowed on Saturday)
उद्या रविवार दिनांक ११/o७/२०२१ रोजी जामखेड ग्रामीण रुग्णालयात कोरोना लसीकरण सुरु राहणार आहे. उद्या कोवॅक्सिन लसीचा पहिला डोस व दुसरा डोस उपलब्ध होणार आहे.सकाळी ९ ते ५ या वेळेत १८ वर्षे वयोगटापुढील लाभार्थ्यांना १ला डोस देण्यात येईल तसेच ज्या लाभार्थ्यांना पहिला डोस घेऊन २८ दिवस पूर्ण झाले आहेत त्यांना कॉवक्सिनचा दुसरा डोस दिला जाणार आहे. हि प्रक्रिया टोकन पद्धतीने होईल अशी माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ संजय वाघ यांनी जामखेड टाईम्स शी बोलताना दिली