जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सत्तार शेख । पाटोदा येथील समीरभाई आणि गफ्फारभाई हे दोघे पठाण बंधू सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सक्रीय आहेत. सामाजिक क्षेत्रातील विशेष योगदानामुळे दोघेही तालुक्यात कायम चर्चेत असतात, संकट कुठलेही असो दोघेही सदैव मदतीसाठी तत्पर असतात.जात धर्म पंथाच्या पलिकडे माणुसकी अन मानवता धर्मासाठी दोघांचे काम सुरू आहे. यंदाच्या पावसाळ्यात भवर नदीवरील पुल वाहून गेला, मोठी दुर्घटना होऊ नये यासाठी पठाण बंधूंनी योग्य दक्षता घेतली. पत्रकारांना वेळीच माहिती कळवली, सर्व पत्रकारांनी त्या घटनेत योग्य प्रसिद्धी दिली. यातून जनतेला मोठी मदत झाली, अश्या भावना पत्रकार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना अनेक पत्रकारांनी व्यक्त केली.
पत्रकारांमुळे समाजातील अनेक समस्या शासन दरबारी जातात व त्या सुटतात. लोकांचा आवाज सरकारपर्यंत पोहोच करण्याचे काम खऱ्या अर्थाने पत्रकार करत आहेत. पत्रकार हा शासन व जनता यामधील महत्वाचा दुवा आहे. निर्भीड पत्रकारांमुळे लोकशाही जिवंत आहे. लोकशाहीला बळकट आणि प्रगल्भ करण्याबरोबरच समाजाच्या सेवेसाठी सदैव तत्पर असलेल्या पत्रकारांचा सन्मान करणे हे आपले सर्वांचेच कर्तव्य आहे, म्हणूनच जामखेड तालुक्यातील पत्रकार बांधवांचा यथोचित सन्मान केला, अशी भावना यावेळी माजी सरपंच समीरभाई पठाण यांनी व्यक्त केली.
सामाजिक कार्यकर्ते समीरभाई पठाण मित्रमंडळाच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त जामखेड तालुक्यातील पत्रकारांचा नुकताच गौरव करण्यात आला.जामखेड तालुक्यातील पाटोदा (गरड) ग्रामपंचायत कार्यालयात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामीण भागात पत्रकार दिनाचा पहिला कार्यक्रम घेण्याचा मान समीरभाई पठाण आणि पाटोदा ग्रामस्थांनी पटकावला.
पत्रकार दिनाचे औचित्य साधून पाटोदा येथील माजी सरपंच समीरभाई पठाण यांच्या वतीनेजामखेड मिडिया क्लबचे अध्यक्ष सुदाम वराट,सचिव सत्तार शेख, दत्तात्रय राऊत, अविनाश बोधले, मिठुलाल नवलाखा, लियाकत शेख, ओंकार दळवी, अशोक वीर, प्रकाश खंडागळे, अशोक वीर, समीर शेख, धनराज पवार, पप्पूभाई सय्यद, रोहित राजगुरू, सुजीत धनवे, यासीन शेख सह आदी पत्रकारांचा यथोचित सन्मान करण्यात आला.
यावेळी अनिल थोरात, सदाभाऊ कवादे, भाऊसाहेब शिंदे, पंडीत मोरे, अक्षय आमटे, इस्माइल पठाण, गोकुळ महारनवर, मुजाहिद पठाण, सादीक पठाण, अण्णा कात्रजकर, प्रकाश शिंदे सह आदी ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.