NCP Youth Congress | कोरोना लसीच्या गैरसमजुती दुर करण्यासाठी सुशिक्षित घटकाने पुढाकार घ्यावा – गटविकास अधिकारी प्रकाश पोळ

राष्ट्रवादी युवकच्या वतीने 10 हजार इंजेक्शन सिरींजचे वाटप

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : कोरोना लसीकरणाची टक्केवारी वाढवण्यासाठी जामखेड प्रशासन जोमाने काम करत आहे. परंतु लसीबाबत अजुनही समाजात गैरसमजुती आहेत. त्या दुर करण्यासाठी समाजातील सुशिक्षित घटकाने पुढाकार घेणे आवश्यक आहे. लसीकरणाच्या जनजागृतीसाठी समाजाने पुढाकार घेतल्यावर आपण लवकरच कोरोनाला हरवू असा विश्वास गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांनी व्यक्त केला. (Distribution 10,000 injection syringes on behalf NCP Youth Congress)

आमदार रोहित दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जामखेड तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने जामखेड तालुका आरोग्य विभागाला  10000 इंजेक्शन सिरींज मंगळवारी भेट देण्यात आल्या. ग्रामिण रूग्णालयात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात गटविकास अधिकारी पोळ बोलत होते.(Distribution 10,000 injection syringes on behalf NCP Youth Congress)

 

Distribution 10,000 injection syringes on behalf NCP Youth Congress
Distribution 10,000 injection syringes on behalf NCP Youth Congress

यावेळी पंचायत समितीच्या सभापती राजश्री मोरे, प्रभारी तहसीलदार भोसेकर, गटविकास अधिकारी पोळ, वैद्यकीय अधीक्षक डॉ संजय वाघ, तालुका आरोग्य अधिकारी डॉ बोराडे , राष्ट्रवादी पक्षाचे नेते मधुकर राळेभात , बिलाल शेख, अमोल गिरमे, विकास राळेभात, अशोक धेंडे, वसीम सय्यद, वैजीनाथ कोल्हे, प्रशांत राळेभात, हरिभाऊ आजबे, महेश राळेभात, गणेश डोके, आदी उपस्थित होते.