MLA Ram Shinde : खर्डा – सोनेगाव रस्त्याचे काम दर्जेदार करा; कुठलीच तक्रार येता कामा नये – आमदार प्रा. राम शिंदे
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : 28 डिसेंबर 2023 : आमदार प्रा. राम शिंदे (MLA Ram Shinde) यांच्या माध्यमांतून कर्जत जामखेड मतदारसंघात विविध विकास कामे हाती घेण्यात आली आहेत. विकासाचा नवा झंझावात मतदारसंघात निर्माण झाला आहे. त्यातच आता जामखेड तालुक्यातील सोनेगाव भागातील जनतेच्या दृष्टीने महत्वपूर्ण असलेल्या खर्डा – सोनेगाव – नान्नज या मुख्य रस्त्याचे रुपडे लवकरच पालटणार आहे.सुमारे 9 कोटी 50 लाख रूपये खर्चून सोनेगाव – खर्डा या रस्त्यावरील 10 किलोमीटर रस्त्याचे काम सुरू करण्यात आले आहे. सदर रस्ता कामाची आमदार प्रा.राम शिंदे यांनी बुधवारी पाहणी केली. रस्त्याचे काम दर्जेदार करा, कुठलीही तक्रार येता कामा नये, अश्या सक्त सुचना त्यांनी यावेळी संबंधितांना दिला.
आमदार प्रा.राम शिंदे यांच्या माध्यमांतून कर्जत-जामखेड मतदारसंघात विकासाचा नवा झंझावात निर्माण झाला आहे. मतदारसंघातील रस्ते दर्जेदार व्हावेत यासाठी त्यांनी कोट्यावधी रूपयांचा निधी खेचून आणण्यात यश मिळवले आहे. मतदारसंघातील अनेक प्रमुख रस्त्यांची कामे मतदारसंघात वेगाने सुरू झाली आहेत. खर्डा – सोनेगाव- नान्नज – हा अतिशय महत्वाच्या रस्त्यावरील खर्डा ते सोनेगाव या पहिल्या टप्प्यातील रस्त्यासाठी 9 कोटी 50 लाख रूपयांचा निधी मंजुर झाला आहे. प्रत्यक्ष कामास सुरूवात झाली आहे. सदर रस्त्याच्या कामाची आमदार प्रा.राम शिंदे यांनी बुधवारी पाहणी केली. सोनेगाव भागातील अनेक गावांना जोडणारा हा अतिशय महत्त्वपूर्ण रस्ता असून सदर रस्त्याचे काम दर्जेदार करा, कुठलीही तक्रार येता कामा नये, अश्या सक्त सुचना त्यांनी संबंधितांना दिल्या. यावेळी सामाजिक कार्यकर्ते सचिन सर गायवळ व स्थानिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
खर्डा – सोनेगाव या रस्त्याचे वेगाने सुरू झाले आहे. आमदार प्रा.राम शिंदे यांच्या माध्यमांतून दहा किलोमीटर रस्त्यासाठी 9 कोटी 50 लाख रूपयांचा निधी मंजुर करण्यात आला आहे. सदरचा रस्त्याची रुंदी साडेपाच मीटर असणार आहे. त्याचबरोबर दोन मीटरच्या साईडपट्ट्या असणार आहेत. सोनेगाव, सातेफळ व खर्डा या गावाजवळ प्रत्येकी 200 मीटर असे एकुण 600 मीटरचा सिमेंट काँक्रिट रस्ता होणार आहे. सदरचे काम वर्षभरात पुर्ण करण्यात येणार असल्याचे ठेकेदाराकडून सांगण्यात येत आहे.
जामखेड तालुक्यातील ग्रीन व्हॅली अशी ओळख असलेल्या सोनेगाव भागात ऊस लागवडीचे प्रमाण सर्वाधिक आहे. या भागातून जाणाऱ्या खर्डा – सोनेगाव- नान्नज या मुख्य रस्त्याची मोठी दुरावस्था झाली होती. जागोजागी मोठ मोठे खड्डे पडल्यामुळे हा रस्ता वाहतुकीस धोकादायक बनला होता. खराब रस्त्याचा सर्वाधिक फटका ऊस व दुध उत्पादकांना बसायचा. शेतकरी बांधवांना अनंत अडचणींना सामोरे जावे लागत असायचे. सोनेगाव भागातील अनेक गावांमधील नागरिक खराब रस्त्यामुळे त्रस्त झाले होते. सदर रस्ता व्हावा अशी या भागातील नागरिकांनी मागणी होती. त्यानुसार आमदार प्रा.राम शिंदे यांनी सुमारे 9 कोटी 50 लाखांचा निधी मंजूर केला. सामाजिक कार्यकर्ते सचिन सर गायवळ व भाजपच्या कार्यकर्त्यांनी सदर रस्त्याचे काम मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा केला.सदर रस्त्याचे काम मार्गी लागल्यामुळे सोनेगाव व पंचक्रोशीतील जनतेत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.