सर्पदंशाने वयोवृध्दाचा मृत्यू :या गावातील घटना! (Elderly man dies of snakebite)

जामखेड टाईम्स वृत्तसेवा: सर्पदंशाने वयोवृध्दाचा मृत्यू होण्याची दुर्दैवी घटना जामखेड तालुक्यातील पारेवाडी गावात घडली. या घटनेमुळे पारेवाडीवर शोककळा पसरली आहे.(Elderly man dies of snakebite)

याबाबत सविस्तर असे की, बुधवारी पारेवाडी (Parewadi) येथील वयोवृध्द रामभाऊ जयवंता वडवकर हे सायंकाळी साडेचारच्या सुमारास गुरांना वैरण चारा टाकण्यासाठी गंजीजवळ गेले होते. गंजीतून चारा काढत असताना त्यांना सर्पदंश होण्याची घटना घडली होती. जामखेडमधील खाजगी रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. परंतु प्रकृती बिघडल्याने पुढील उपचारासाठी त्यांना अहमदनगरला नेले जात असतानाच त्यांचे वाटेतच काल रात्री निधन झाले.(Elderly man dies of snakebite) आज त्यांच्यावर पारेवाडीत अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे तीन मुले,दोन मुली असा परिवार आहे.