जामखेड टाईम्स वृत्तसेवा : जामखेड तालुक्यातील वंजारवाडी येथील एका युवकाचा विजेच्या तारेला चिटकून (Electric shock) मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली आहे. (death-of-a-youth-sticking-to-an-electric-wire) पहाटे शौचास जाताना विजेच्या तारेला तरूण चिकटल्याची घटना घडली.या घटनेत योगेश बळीराम जायभाय या २३ वर्षीय तरूणाचा मृत्यू झाला आहे. तर त्याला वाचवण्यासाठी धावलेले त्याचे वडिल व मोठा भाऊ जखमी झाले आहेत.या प्रकरणी जामखेड पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, योगेश योगेश बळीराम जायभाय याच्या घराजवळ विद्युत खांबावरील तार तुटून पडली होती. ती तार योगेशला शौचास जाताना दिसली नाही. त्याचा पाय तारेवर पडल्याने त्याला शॉक बसला (Electric shock) व तो तारेला चिकटला. यावेळी तो जोराने ओरडला त्यावेळी त्याचे वडील बळीराम जायभाय व भाऊ गोकुळ जायभाय यांनी योगेशला ओढण्याचा प्रयत्न केला असता त्या दोघांनाही शॉक बसला व ते ही खाली पडले.योगेशचे वडील बळीराम हे बेशुद्ध पडले होते तर भाऊ गोकुळ याचाही हात यावेळी भाजला होता.
त्यावेळी शेजारील राहणारे नातेवाईकांनी दोरीच्या साह्याने तार बाजुला करून योगेशला बाजूला केले. त्यानंतर त्याला जामखेड येथील ग्रामीण रूग्णालयात आणले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. (Electric shock)
वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय वाघ यांनी मयत योगेशचे शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात मृतदेह दिला. दुपारी उशीरा वंजारवाडी येथे मयत योगेश जायभाय याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.ही घटना पहाटेच्या वेळी घडली. अंधार असल्याने योगेशला विजेची तुटलेली तार दिसली नाही त्यातूनच ही दुर्दैवी अपघाताची घटना घडली. योगेशेच्या अपघाती निधनाने वंजारवाडी व पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे.(Electric shock)
शेतकरी बांधवांनो सध्या पावसाचे दिवस आहेत. या काळात पावसाच्या ओलाव्यामुळे विद्युत प्रवाह उतरण्याच्या घटना घडतात. त्यामुळे सर्वांनी सावधानता बाळगावी. रात्री अपरात्री घराबाहेर पडताना बॅटरी सोबत ठेवूनच घरा बाहेर पडा. आपल्या आसपास कुठे काही अनुचित घडू नये याची दक्षता घ्या.