६५ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद, जामखेड तालुक्यात ८३.५३ टक्के मतदान, वाचा ग्रामपंचायत निवडणुकीची प्रभागनिहाय मतदानाची आकडेवारी
जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सत्तार शेख। जामखेड तालुक्यातील रत्नापुर, राजुरी आणि शिऊर या तीन ग्रामपंचायतींसाठी रविवारी मोठ्या चुरशीच्या वातावरणात मतदान पार पडले. किरकोळ- कारकोळ शाब्दिक चकमकी वगळता कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. सर्वत्र अतिशय शांततेत मतदान पार पडले.जामखेड तालुक्यात विक्रमी 83.53 टक्के मतदान झाले.इतिहासात पहिल्यांदाच तीनही गावांच्या निवडणुका अतिशय प्रतिष्ठेच्या झाल्या. दोन्ही गटाकडे फिरणारा पण स्पष्ट कौल न देणाऱ्या सायलेंट मतदाराने नेमका कोणाचा गेम केला असेल ? याचीच संपूर्ण तालुक्याला उत्सुकता लागली आहे.
जामखेड तालुक्यातील शिऊर, राजुरी आणि रत्नापुर ग्रामपंचायत निवडणुकीचे मतदान रविवारी पार पडले. या तीनही ग्रामपंचायतीत थेट जनतेतून सरपंचपदाची निवडणूक होत असल्याने ही निवडणुक अतिशय प्रतिष्ठेची ठरली. सर्व उमेदवारांनी आपली सर्व ताकद पणाला लावली होता. यंदा सरपंचपदासाठी राजुरीत तिरंगी, रत्नापूरात चौरंगी तर शिऊरमध्ये तिरंगी लढत रंगली होती. पण खरी लढत भाजप विरूध्द राष्ट्रवादी यांच्यात झाल्याचे तिन्ही गावांत दिसून आले.जामखेड तालुक्यातील 3 ग्रामपंचायतमधील 27 सदस्यपदांच्या जागांसाठी 55 उमेदवारांच्या आणि सरपंचपदाच्या 3 जागांसाठी दहा उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला रविवारी मतपेटीत बंद झाला.
रत्नापुर, राजुरी आणि शिऊर ग्रामपंचायत निवडणुकीत सकाळपासूनच मतदारांनी मतदानास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मतदारांना मतदान केंद्रावर घेऊन येण्यासाठी दोन्ही गटांतील कार्यकर्ते आणि पॅनल प्रमुख कसरत करताना दिवसभर दिसले, मतदारांनी सकाळी आणि दुपारनंतर उत्स्फूर्तपणे घराबाहेर पडले होते. यामुळे तीनही गावांत विक्रमी मतदान झाले. राजुरीत 82.33 टक्के, शिऊरमध्ये 82.35 टक्के तर रत्नापूरात 86.20 टक्के मतदान झाले. तहसीलदार योगेश चंद्रे आणि पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांनी निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी तगडे नियोजन केले होते. सर्वच ठिकाणी चोख बंदोबस्त होता.
राजुरी ग्रामपंचायत प्रभागनिहाय मतदान खालीलप्रमाणे
प्रभाग एक
एकुण मतदान : 902 (महिला 408 + पुरुष 494)
झालेले मतदान : 721 (महिला 317 + पुरूष 404)
प्रभाग दोन
एकुण मतदान : 491 (महिला 216 + पुरुष 275 )
झालेले मतदान : 432 (महिला 193 + पुरूष 239)
प्रभाग तीन
एकुण मतदान : 724 (महिला 342 + पुरुष 382)
झालेले मतदान : 590 (महिला 267 + पुरूष 323)
राजुरी ग्रामपंचायत निवडणुकीत एकुण 2117 (महिला 966 + पुरुष 1151 ) मतदार मतदानास पात्र होते. यापैकी 1743 ( महिला 777 + पुरुष 966 ) मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
रत्नापुर ग्रामपंचायत निवडणुकीतील प्रभागनिहाय मतदान खालीलप्रमाणे
प्रभाग एक
एकुण मतदान : 539 (महिला 268 + पुरुष 271)
झालेले मतदान : 477 (महिला 230 + पुरूष 247)
प्रभाग दोन
एकुण मतदान : 753 (महिला 372 + पुरुष 381)
झालेले मतदान : 646 (महिला 314 + पुरूष 332)
प्रभाग तीन
एकुण मतदान : 780 (महिला 370 + पुरुष 410)
झालेले मतदान : 663 (महिला 296 + पुरूष 367)
रत्नापुर ग्रामपंचायत निवडणुकीत एकुण 2072 (महिला 1010 + पुरुष 1062 ) मतदार मतदानास पात्र होते. यापैकी 1786 (महिला 840 + पुरुष 946) मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
शिऊर ग्रामपंचायत निवडणुकीतील प्रभागनिहाय मतदान खालीलप्रमाणे
प्रभाग एक
एकुण मतदान : 1027 (महिला 481 + पुरुष 546)
झालेले मतदान : 849 (महिला 390 + पुरूष 459)
प्रभाग दोन
एकुण मतदान : 746 (महिला 345 + पुरुष 401)
झालेले मतदान : 585 (महिला 260 + पुरूष 325)
प्रभाग तीन
एकुण मतदान : 788 (महिला 352 + पुरुष 436)
झालेले मतदान : 675 (महिला 297 + पुरूष 378)
शिऊर ग्रामपंचायत निवडणुकीत एकुण 2571 (महिला 1178 + पुरुष 1383 ) मतदार मतदानास पात्र होते. यापैकी 2109 ( महिला 947 + पुरुष 1162 ) मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.