active corona patients | चिंताजनक : जामखेड तालुक्यात सक्रीय कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या गेली 500च्या पुढे

 

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : जामखेड तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा मोठा प्रादुर्भाव वाढला आहे. शनिवारी कोरोनाने पुन्हा एकदा मोठा दणका दिला आहे. सक्रीय कोरोनाबाधित (active corona patients ) रूग्णांची संख्या ५००च्या पार झाली आहे. शनिवारी जवळपास शंभरच्या आसपास नवीन कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे तालुक्यातील पाच गावांमधील व्यवहार बंद करण्यात आले आहेत.

जामखेड तालुक्यातील फक्राबाद, तेलंगशी ( पवारवस्ती) , रत्नापुर, मोहा ( इंगळेवस्ती) जवळा बोराटे वस्ती, हापटेवाडी, नानेवाडी ( चौधरीवस्ती ) या भागात कोरोनाचा उद्रेक (active corona patients ) वाढल्याने ही गावे कंटनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आली आहेत.

 

शनिवारी जामखेड तालुका आरोग्य विभागाने ८७४ नागरिकांच्या रॅपिड अँटीजेन चाचण्या केल्या यामध्ये रत्नापुर ०५, फक्राबाद ०५, जवळके ०२, फाळकेवाडी ०१ असे १३ रूग्ण आढळून आले. तर RTPCR अहवालात जामखेड २५, फक्राबाद ०३, खर्डा ०८, रत्नापुर ०५, जवळके ०३, शिउर ०२,साकत ०२,धोतरी ०३,डोणगाव ०२,हापटेवाडी ०१,कुसडगाव ०१, धानोरा०१,कोल्हेवाडी ०१,गोयकरवाडी ०१, पिंपळवाडी ०१, धोंडपारगाव ०२,बोरला ०२,राजुरी ०१,सरदवाडी ०१,चौंडी ०१,पिंपरखेड०२,मोहा०२, जवळा०३, पिंपळगाव उंडा ०१ काटेवाडी ०१ अश्या ७२ तर इतर तालुक्यातील ०५ असे एकुण ७७ रूग्ण (active corona patients )आढळून आले आहेत.

 

शनिवारी दिवसभरात जामखेड तालुक्यात एकुण ८५ नवे कोरोनाबाधित रूग्ण (active corona patients ) आढळून आले आहेत. तर ५०७ नागरिकांचे स्वॅबनमुने RTPCR तपासणीसाठी अहमदनगर जिल्हा रूग्णालयात पाठवण्यात आले आहेत.

जामखेड पोलीस स्टेशनने घेतली हॉटेल व्यावसायिक व मंगल कार्यालय चालकांची बैठक 

जामखेड शहर व तालुक्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव (active corona patients ) लक्षात घेता शहरातील  हॉटेल मालक / चालक तसेच मंगल कार्यालय चालक/ मालक यांची पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड व सहायक पोलीस निरीक्षक महेश जानकर यांनी जामखेड पोलीस स्टेशन येथे बैठक घेतली.

active corona patients

या बैठकीत कोरोना प्रतिबंधात्‍मक नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई करण्याचा इशारा पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांनी दिला. त्याचबरोबर हाॅटेल व्यावसायिक व मंगल कार्यालय चालकांचे म्हणणे जाणून घेतले. शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन न केल्यास कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल अशी समज पोलिसांकडून देण्यात आली. सर्वांनी प्रशासनास सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. या मीटिंगसाठी पोलीस नाईक अविनाश ढेरे यांनी नियोजन केले होते. (active corona patients )

active corona patients