Arangaon Gram Panchayat: सरपंच अंकुश शिंदे यांच्या गटाला बसला मोठा हादरा !

 

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : जामखेड तालुक्यातील अरणगाव ग्रामपंचायतमध्ये बुधवारी मोठा भूकंप झाला. सरपंच अंकुश शिंदे यांच्या गटाला हादरा देणारी एक बातमी समोर आली आहे. (Big earthquake in Arangaon Gram Panchayat)

सरपंच अंकुश शिंदे यांच्या निवडीला अव्हान देणारा दावा जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी मंजुर केला आहे. त्यानुसार अरणगाव ग्रामपंचायतच्या (Arangaon Gram Panchayat) सरपंच व उपसरपंचपदाची निवडणूक रद्द झाली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

अरणगाव ग्रामपंचायतची सरपंचपदाची निवड प्रक्रिया ०९ फेब्रुवारी २०२१ रोजी पार पडली होती. या निवडणुकीत सरपंचपदाच्या उमेदवार रब्बाना सादिक शेख यांच्याकडे बहुमत असतानाही अंकुश शिंदे यांची सरपंचपदी वर्णी लागली होती. या निवडीनंतर अरणगावमध्ये मोठा राजकीय गदारोळ झाला होता.

दरम्यान सरपंचपदाच्या पराभूत उमेदवार रब्बाना सादिक शेख यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात या निवड प्रक्रियेविरोधात दावा दाखल केला होता. यावर दि ०९ ऑगस्ट २०२१ रोजी अहमदनगरचे जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले यांनी निकाल दिला आहे. त्यात अरणगावची सरपंच व उपसरपंच पदाची निवडणुक रद्द करण्यात येत असल्याचा महत्वपूर्ण निकाल दिला आहे.

(News riport by Imran Shaikh )