जामखेड टाइम्स वृत्तसेवा : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त हर घर झेंडा मोहिमेची हळगावमध्ये मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. तब्बल 700 च्या आसपास घरांवर तिरंगा ध्वज फडकविण्यात आल आहे. ग्रामपंचायतने सर्व ध्वज मोफत उपलब्ध करून दिले आहेत.
हर घर झेंडा मोहिमेअंतर्गत हळगाव ग्रामपंचायतमध्ये मोठ्या उत्साहात ध्वजारोहण संपन्न झाले. उपसरपंच आबासाहेब ढवळे यांच्या हस्ते ग्रामपंचायत कार्यालयासमोर ध्वजारोहण पार पडले.
यावेळी जेष्ठ नेते किसनराव ढवळे, सरपंच अनिताताई ढवळे, तलाठी मुजीब शेख, सुशेन ढवळे, नवनाथ ढवळे, सुनिल ढवळे, नानासाहेब ढवळे, महादेव रंधवे, धनंजय ढवळे, बापुराव ढवळे, मराठी शाळेचे मुख्याध्यापक हजारे सर सह विद्यार्थी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.