आईकडून झालेला सन्मान जगातील कुठल्याही पुरस्कारापेक्षा मोठा : जवळेकरांनी निर्माण केला नवा आदर्श
जवळ्यात पार पडला ऋणानुबंध सन्मान सोहळा
जामखेड टाईम्स वृत्तसेवा । सत्तार शेख। आईकडून झालेला सन्मान जगातील कुठल्याही पुरस्कारापेक्षा सर्वात मोठा सन्मान असतो. हा सन्मान घेण्याचे भाग्य आम्हा शिक्षकांना मिळाले. मातृभूमीने आमच्या सेवेची घेतलेली ही दखल जीवन सार्थक करणारी ठरली आहे अशी भावनिक प्रतिक्रिया केंद्रप्रमुख सुरेश कुंभार यांनी व्यक्त केली.
जवळा गावातील शिक्षक, डाॅक्टर व पंचक्रोशीतील पत्रकार यांच्याकडून होत असलेल्या सामाजिक सेवेबद्दल ‘ऋणानुबंध’ व्यक्त करण्यासाठी जवळा गावचे युवा सरपंच प्रशांत शिंदे यांच्या पुढाकारातून ऋणानुबंध सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी केंद्रप्रमुख सुरेश कुंभार बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समिती सदस्य सुभाष अव्हाड हे होते.
शिक्षकापासून केंद्र प्रमुख पर्यंतच्या प्रवासात विविध सन्मान मिळाले परंतु गावकऱ्यांच्या वतीने झालेला सन्मान हा माझ्यासाठी खूप मोलाचा आहे असे सुरेश कुंभार म्हणाले.
यावेळी माजी पंचायत समिती सभापती सुभाष आव्हाड,विष्णू हजारे, केंद्र प्रमुख सुरेश कुंभार, डॉ महादेव पवार,डॉ दिपक वाळूंजकर, युवा नेते प्रशांत शिंदे,डॉ राजेंद्र मोहळकर,डॉ श्रीरंग वायकर, डॉ पांडुरंग हजारे, अंबादास रोडे,विकास बगाडे, पत्रकार दिपक देवमाने, लियाकत शेख, सत्तार शेख , संदेश हजारे, संतराम सूळ,मोहिद्दीन तांबोळी, आदी उपस्थित होते.
सुभाष आव्हाड म्हणाले कि, समाजासाठी सतत आहोरात्र पत्रकार,डॉक्टर व शिक्षक हे कष्ठ घेत आहेत त्यांचा सन्मान करणे हा उद्देश ठेऊन हा कार्यक्रम प्रशांत शिंदे यांनी घेतल्याने समाधान असल्याचे आव्हाड यांनी बोलताना केले.
दरवर्षी होणार ऋणानुबंध सन्मान सोहळा
प्रशांत शिंदे म्हणाले कि, कुठल्याही क्षेत्रात काम करत असताना त्या व्यक्तीच्या कर्तुत्वाचा सन्मान करणे जवळा गावचा प्रथम नागरिक म्हणून माझे कर्तव्य आहे. याच भावनेतून ऋणानुबंध सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यंदा पत्रकार,डॉक्टर व शिक्षक यांना सन्मानित केले. दरवर्षी दिवाळी पाडव्याला जवळा गावात या कार्यक्रमाचे आयोजन होईल असा शब्द शिंदे यांनी दिला.
आमचे कौतुक नको पण आम्ही चुकत असू तर आवर्जून सांगा
आपापल्या क्षेत्रात उल्लेखनीय काम करून जवळा गावचे नाव उज्ज्वल करणाऱ्या भूमिपुत्रांचा मातृभूमीच्या वतीने सन्मानित करणे हाच या कार्यक्रमाचा हेतू होता. राजकारणविरहित गाव विकासाची चर्चा या निमित्ताने व्हावी. आमच्या सारख्या तरूण कार्यकर्त्यांचे जिथे चुकत असेल ते आमच्या निदर्शनास आणून द्या. आमचे कौतुक करू नका पण आवर्जून चुका दाखवा. चुका दुरूस्त करण्यासाठी आम्ही मेहनत घेऊ. जवळा गाव विकासाच्या नकाशावर नवा आदर्श ठरण्यासाठी बुध्दीजीवी वर्गाचे पाठबळ मोलाचे ठरेल असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला.
… अन भूमिपुत्र भारावून गेले
सरपंच प्रशांत शिंदे यांच्या पुढाकारातून जवळा परिसरातील १० पत्रकार ८० शिक्षक व ३० डॉक्टर, आशा सेविका आश्या एकुण ११० कर्तुत्ववान भूमिपुत्रांना डायरी व एक पेन देऊन या सोहळ्यात सन्मानित करण्यात आले. ज्या मातीत जन्मलो वाढलो त्या मातीत आपला सन्मान होत आहे ही भावना सर्वांच्याच चेहर्यावर झळकत होती. यातून सर्वच जण भारावून गेले होते.यावेळी सत्कारानंतर अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
जवळेकरांनी निर्माण केला नवा आदर्श
जामखेड तालुक्याच्या राजकीय,सामाजिक व सांस्कृतिक पटावर वेगवेगळ्या सृजनात्मक उपक्रमातून जवळा हे गाव नेहमी चर्चेत असते. अश्याच एका नाविन्यपूर्ण उपक्रमाची सुरूवात जवळा गावात यंदा झाली. ‘ऋणानुबंध सन्मान सोहळा’ या उपक्रमातून जवळेकरांनी नवा आदर्श उभा केला. यावेळी सूत्रसंचालन विकास हजारे यांनी केले तर प्रशांत कुंभार यांनी आभार मानले.
ऋणानुबंध सन्मान सोहळ्यात यांना करण्यात आले सन्मानित
दिपक देवमाने (पुढारी), संतराम सुळ (सामना) संदेश हजारे (लोकमत) सत्तार शेख (जामखेड टाईम्स), लियाकत शेख (पुढारी), मोहिद्दीन तांबोळी (पुण्यनगर) समीर शेख (सार्वमत) या पत्रकारांना सन्मानित करण्यात आले.
डॉक्टर महादेव पवार, डॉक्टर रासने, डॉक्टर सुरेश ढगे डॉक्टर दीपक वाळुंजकर, डॉक्टर तोडकर, डॉक्टर बारस्कर, डॉक्टर सरकार, डॉक्टर अतुल दिनेश रोडे, डॉक्टर संदीप केदार,डॉक्टर प्रमिला काळे, डॉक्टर किसन राऊत, डॉक्टर पांडुरंग हजारे, डॉक्टर महेश हजारे, डॉक्टर अमृत जाधव, डॉक्टर संदीप आटोळे, डॉक्टर ईश्वर हजारे, डॉक्टर जावेद सय्यद डॉक्टर डफळ सह आदींना सन्मानित करण्यात आले.
केंद्रप्रमुख सुरेश कुंभार, हरिभाऊ कोल्हे, अनिल आव्हाड, राजेंद्र हजारे, दत्ता कोल्हे, राजेंद्र मोहळकर, बापू हजारे, सुभाष फासले, अनिल शिंदे, लक्ष्मीकांत हिंगणे, सोमनाथ काळे, शिवाजी रोडे, अतुल कोल्हे, बाळासाहेब रोडे, प्रशांत कुंभार, विकास हजारे, महेश हजारे, गणेश रोडे, सागर कळसकर, भरत कोल्हे, शिवाजी कोल्हे, किरण फसले, अशोक रोडे, सादिक शेख, अंबादास रोडे, संजय हजारे,विकास बागडे, सुभाष सरोदे, लक्ष्मण हजारे, श्रीमती बारस्कर, शबनम सय्यद, प्रशांत आव्हाड मिलिंद आव्हाड, पल्लवी वाळुंजकर, राजश्री आव्हाड,श्रीराम कांबळे, संभाजी कोल्हे, पाचपुते मॅडम, राऊत दादा, अलीम शेख, राजू सूळ, राहुल शिंदे, प्रदीप आव्हाड, प्रकाश सुरवसे शिवाजी कोल्हे सह आदी शिक्षकांचा यावेळी सन्मान करण्यात आला.
आशा सेविका सुरेखा हजारे उमा जाधव उर्मिला कोकाटे यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला.
असा रंगला ऋणानुबंध सन्मान सोहळा