जामखेड टाईम्स वृत्तसेवा : Jamkhed Taluka Corona Update | जामखेड तालुक्यात कोरोना रूग्ण वाढतच आहेत. मंगळवारी थंडावलेला कोरोना पुन्हा बुधवारी ( दि १८ ऑगस्ट २०२१ रोजी) वाढला. बुधवारी दिवसभरात एकुण २६ नवे रूग्ण आढळून आले आहेत.
Jamkhed Taluka Corona Update | बुधवारी दिवसभरात एकुण ५८३ नागरिकांच्या रॅपिड अँटीजेन चाचण्या करण्यात आल्या त्यामध्ये जवळा ०१, शिऊर ०१, जवळके ०१, साकत ०२ असे सहा रूग्ण आढळून आले.
Jamkhed Taluka Corona Update | तसेच RTPCR अहवालात जामखेड ०२, बांधखडक ०३, जवळके ०१, नान्नज ०१, पिंपळगाव उंडा ०१, मोहरी ०२, शिऊर ०२, पिंपरखेड ०१, नाहुली ०२, भूतवडा ०१, हळगाव ०१, खर्डा ०१ असे १९ तर इतर तालुक्यातील ०१ असे एकुण २० रूग्ण आढळून आले आहेत.
रॅपिड व RTPCR हे दोन्ही अहवाल मिळून तालुक्यात एकुण २५ नवे रूग्ण आढळून आले आहेत. आरोग्य विभागाने दिवसभरात एकुण ५०५ RTPCR स्वॅबनमुने कोरोना तपासणीसाठी अहमदनगर जिल्हा रूग्णालयात पाठवले आहेत अशी माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ संजय वाघ यांनी दिली.