जवळा – जामखेड रस्ता तातडीने दुरुस्ती करा;अन्यथा 14 ऑक्टोबर रोजी ठिय्या आंदोलन – आरती देवमाने

जामखेड : जवळा – जामखेड रस्त्यातील तसेच जवळा येथील जवळेश्वर रथ मार्गावरील खड्डे तातडीने बुजवावेत अन्यथा ठिय्या आंदोलन करणार असल्याचा इशारा जवळा ग्रामपंचायत सदस्या आरती देवमाने यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग जामखेड यांना दि 4 ऑक्टोबर रोजी दिलेल्या निवेदनात दिला आहे.

आरती देवमाने यांनी निवेदनात म्हंटले आहे कि, जामखेड ते जवळा रस्त्यात मोठे खड्डे पडले असून त्यामध्ये छोटे मोठे अपघात होत आहेत. जवळा ते जामखेड या रस्त्यावर मोठ्याप्रमाणात जवळा, नान्नज ,धोंडपारगाव , झिक्री , पाडळी, सह आदी गावातील व्यावसायिक जामखेड ला ये जा करत आहेत. त्यामुळे या रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजविण्यात यावे.

तसेच जवळा येथील जवळेश्वर रथ मार्गावर मोठ्याप्रमाणावर खड्डे पडले आहेत , या रस्त्यावर खड्डे पडल्यामुळे छोठे मोठे अपघात होत आहेत. जवळेश्वर रथ मार्गाचा रस्ता सन २०१७ मध्ये करण्यात आला असून तो रस्ता गावांतर्गत असून खड्डे पडल्याने खराब झाला आहे. या दोन हि रस्त्यातील खड्डे बुजवुन तातडीने दुरुस्त न केल्यास सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयामध्ये 14 ऑक्टोबर रोजी ठिय्या आंदोलन करण्यात येणार असल्याचे आरती देवमाने यांनी यावेळी सांगितले.