हळगाव सोसायटीच्या चेअरमनपदी जेष्ठ नेते किसनराव ढवळे यांची बिनविरोध निवड

जामखेड टाईम्स वृत्तसेवा । सत्तार शेख । जामखेड तालुक्यातील हळगाव सेवा संस्थेच्या चेअरमनपदी जेष्ठ नेते किसनराव ढवळे यांची सलग दुसर्‍यांदा तर तर व्हाईस चेअरमनपदी सुरेखा सुदाम लेकुरवाळे यांची निवड करण्यात आली. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात बिनविरोध निवडी पार पडल्या. या निवडीबद्दल सहकार महर्षी जगन्नाथ (तात्या) राळेभात यांनी अभिनंदन केले आहे.

जामखेड तालुक्याच्या राजकारणात महत्वाच्या असलेल्या हळगाव विविध कार्यकारी सेवा संस्थेची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली.या निवडणुकीत जेष्ठ नेते किसनराव ढवळे यांच्या पॅनलने दिमाखदार विजय संपादन करत विरोधकांचा धुराळा उडवला होता. जेष्ठ नेते किसनराव ढवळे यांच्या गटाकडे सेवा सोसायटीवर 25 वर्षापेक्षा अधिक काळापासून सत्ता आहे. यंदाही त्यांच्याच गटाकडे सत्ता कायम राहिली.

दरम्यान 4 एप्रिल रोजी हळगाव सेवा संस्थेच्या चेअरमन आणि व्हाईस चेअरमन पदाची निवड पार पडली.सहाय्यक निबंधक तथा निवडणूक निर्णय अधिकारी देविदास घोडेचोर यांच्या अध्यक्षतेखाली संस्थेच्या कार्यालयात निवडणूक प्रक्रिया घेण्यात आली. यावेळी चेअरमनपदासाठी जेष्ठ नेते किसनराव ढवळे यांच्या नावाची सूचना अंकुश खिवराज ढवळे (सर) यांनी मांडली, या सुचनेस सुरेखा सुदाम लेकुरवाळे यांनी अनुमोदन दिले. चेअरमनपदासाठी एकमेव सुचना आल्याने जेष्ठ नेते किसनराव ढवळे यांची बिनविरोध निवड झाली.

Senior Leader Kisanrao Dhawale elected unopposed as Chairman of Halgaon Society

त्यानंतर व्हाईस चेअरमन पदासाठी सुरेखा सुदाम लेकुरवाळे यांच्या नावाची सुचना बाबासाहेब भिमराव पुराणे यांनी मांडली, या सुचनेस नारायण जानकू करगळ यांनी अनुमोदन दिले. लेकुरवाळे यांचीही बिनविरोध निवड झाली.यावेळी पाराजी कापसे, धनंजय बाबा ढवळे, केरबा वाघमोडे, जगन मंडलिक, बबन जयवंता ढवळे, रविंद्र सोमनाथ कापसे, मंकाबाई बापू कापसे, रूपाली संजय ढवळे हे सर्व संचालक उपस्थित होते.

दरम्यान यावेळी नवनिर्वाचित चेअरमन व व्हाईस चेअरमन यांचा सर्व संचालकांनी सत्कार केला. सर्व संचालकांच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे दरवर्षी गुढी पाडव्याला नव्या व्हाईस चेअरमनची निवड केली जाणार आहे.संचालक मंडळात सत्तेचा समतोल राखण्यासाठी सर्वानुमते हा निर्णय घेण्यात आला.

दरम्यान सरपंच अनिताताई सुशेन ढवळे, संस्थेचे सचिव दत्तात्रय चौरे, बाळासाहेब होशिंग, सुदाम लेकुरवाळे, मदन लेकुरवाळे, हरी शिंदे, उत्तम कापसे, धनंजय ढवळे, दादा कापसे, राजेंद्र ढवळे, मदन कापसे, गोरख कापसे, सुभाष कापसे सर, बापुराव कापसे, धोंडिबा कापसे, रामा कापसे, गोपीनाथ कापसे, आदेश कापसे, बलभीम कापसे सह आदी उपस्थित होते.