Today Big Breaking | जामखेड तालुक्याला कोरोनाचा मोठा दणका; सावधान रूग्ण वाढू लागले !

जामखेड टाईम्स वृत्तसेवा  : Today Big Breaking | जामखेड तालुक्यात मागील काही दिवसांपासून थंडावलेला कोरोना मागील दोन दिवसांपासून पुन्हा सक्रीय झाला आहे. कोरोना अचानक सक्रीय होत असल्याने जामखेडकरांच्या चिंता वाढल्या आहेत. जामखेड तालुक्यात मंगळवारी व बुधवारी या दोन दिवसात एकुण 46 रूग्ण आढळून आले आहेत. कोरोनाचा उद्रेक पुन्हा होऊ लागला की काय अशी भीती आता व्यक्त केली जात आहे.

जामखेड तालुका आरोग्य विभागाने मंगळवारी 21 सप्टेंबर 2021 रोजी 588 नागरिकांच्या रॅपिड अँटीजेन चाचण्या केल्या त्यामध्ये पाडळी 03, अरणगाव 03, वाकी 01 असे 07 रूग्ण आढळून आले होते.

तर RTPCR तपासणी अहवालात  जामखेड 01, पाटोदा 01, धामणगाव 05, बावी 06, पाडळी 02, धोंडपारगाव 01, पिंपळगाव आळवा 01, जवळा 01 असे 18 नवे कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले होते.  तसेच आरोग्य विभागाने दिवसभरात एकुण 457 नागरिकांचे RTPCR स्वॅबनमुने कोरोना तपासणीसाठी जिल्हा रूग्णालयात पाठवले होते.

तसेच बुधवारी 22 सप्टेंबर 2021 रोजी जामखेड तालुका आरोग्य विभागाने 625 नागरिकांच्या रॅपिड अँटीजेन चाचण्या केल्या आहेत. त्यामध्ये पाडळी 01, अरणगाव 01,  वाकी 02, डोणगाव 01, शिऊर 01 असे 06 नवे कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले आहेत.

तर RTPCR तपासणी अहवालात जामखेड 07,  पाटोदा 01, धामणगाव 01, बावी 02, खर्डा 02, खुरदैठण 01, बटेवाडी 01, असे 15 नवे कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले आहेत . तर 436 नागरिकाचे RTPCR स्वॅबनमुने कोरोना तपासणीसाठी जिल्हा रूग्णालयात पाठवण्यात आले आहेत.

मंगळवारी  25 व बुधवारी 21 असे एकुण 46 नवे कोरोनाबाधित रूग्ण जामखेड तालुक्यात आढळून आले आहेत. जामखेड तालुक्यात कोरोनाचा उद्रेक पुन्हा वाढला आहे. नागरिकांनी अजुनही सतर्क राहणे आवश्यक आहे. अन्यथा तालुक्यात कोरोना पुन्हा एकदा मोठा विध्वंस घडवू शकतो अशी भीती व्यक्त केली जात आहे.

 

web taital : today big breaking big bang of corona in jamkhed taluka