जामखेड टाईम्स वृत्तसेवा । सत्तार शेख । आदिनाथ कारखान्याचे माजी संचालक तथा जेष्ठ नेते किसनराव ढवळे यांचे कट्टर समर्थक अशी ओळख असलेल्या युवा नेते तथा पुण्यश्लोक अहिल्यादेवी पतसंस्थेचे चेअरमन आबासाहेब ढवळे यांची जामखेड तालुक्यातील हळगाव ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली.
विद्यमान उपसरपंच अशोक रंधवे यांचा कालावधी संपल्याने त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता, त्यानंतर रिक्त झालेल्या उपसरपंचपदाच्या जागेवर युवा नेते आबासाहेब ढवळे यांची उपसरपंच म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली.
सत्ताधारी आणि विरोधी गटातील सर्व सदस्यांनी आबासाहेब ढवळे यांच्या नावाला सहमती दर्शवली.ही निवड प्रक्रिया शुक्रवारी हळगाव ग्रामपंचायत कार्यालय येथे संपन्न झाली. सरपंच अनिताताई ढवळे यांच्या अध्यक्षतेखालील झालेल्या सभेत ही निवड करण्यात आली.ग्रामसेविका निलिमा कुबसंगे आणि ग्रामसेवक शिंदे यांनी ही प्रक्रिया पार पाडली.
ग्रामपंचायत सदस्या भारती हिरडे यांनी आबासाहेब ढवळे यांचे नाव उपसरपंचपदासाठी सुचवले होते, उपसरपंचपदासाठी आबासाहेब ढवळे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.
यावेळी सरपंच अनिताताई ढवळे,मावळते उपसरपंच अशोक रंधवे, ग्रामपंचायत सदस्य आदिकाबाई बाळासाहेब ढवळे, कुसुम कांतीलाल ढवळे, बायडाबाई बबन ढवळे, नंदा अशोक मंडलिक,रामदास शिंदे, दगडू पुराणे, सुनंदा नवनाथ ढवळे सह आदी ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.
आबासाहेब ढवळे यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड होताच जेष्ठ नेते किसनराव ढवळे यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी पै. राजु भैय्या सय्यद,अंकुश ढवळे सर, सुशेन ढवळे, महादेव रंधवे, धनंजय ढवळे, नानासाहेब ढवळे, मारूती करगळ, सुरेश ढवळे, बाळासाहेब ढवळे, दगडू जमदाड, शरद हिरडे, बाळासाहेब पुराणे, शांतीलाल लांडे, बापुराव ढवळे, संजय मंडलिक, जनार्दन लबडे, अशोक ढवळे,तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी नवनिर्वाचित उपसरपंच आबासाहेब ढवळे यांचा सत्कार केला.
कोण आहेत आबासाहेब ढवळे ?
आबासाहेब ढवळे हे तरूण तडफदार युवा राजकीय व सामाजिक कार्यकर्ते म्हणून जामखेड तालुक्याच्या राजकारणात ओळखले जातात, त्यांनी यापुर्वी एकदा हळगावचे उपसरपंचपद भूषवले आहे. तसेच सध्या ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी पतसंस्थेचे चेअरमन, जामखेड तालुका पतसंस्था फेडरेशनचे संचालक तसेच ग्रामीण बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष आणि बळीराजा मल्टीपर्पज सहकारी संस्थेचे अध्यक्ष आहेत.
याशिवाय ग्रामपंचायत सदस्य असलेल्या आबासाहेब ढवळे यांच्या खांद्यावर जेष्ठ नेते किसनराव ढवळे यांनी दुसर्यांदा उपसरपंचपदाची धुरा सोपवली आहे. आबासाहेब ढवळे हे तरूण वर्गातील सर्वसमावेशक लोकप्रिय नेतृत्व आहे, ढवळे यांच्या निवडीमुळे सर्वच गटांकडून त्यांचे स्वागत आणि अभिनंदन करण्यात आले.
आबासाहेब ढवळे यांच्या निवडीनंतर काय म्हणाले गावातील नेते ? पहा ⬇️