शेतकऱ्यांसाठी खुशखबर : पोटखराब क्षेत्राची होणार ‘लागवडीयोग्य क्षेत्र’ अशी नोंद : या तारखेपासुन होणार अंमलबजावणी (Good news for farmers:Sub-poor area will be ‘cultivable area’ Note: Implementation will start from this date)

जामखेड टाईम्स वृत्तसेवा (सत्तार शेख): ‘पोटखराब क्षेत्र’ अशी नोंद असलेल्या शेतकऱ्यांना पीककर्ज, पीकविमा, नैसर्गिक आपत्तीत नुकसान भरपाई तसेच शासनाच्या अनेक योजनांपासुन वंचित राहावे लागत होते. शासनाचा शेतसाराही बुडत होता मात्र येत्या मार्च अखेरीस पोटखराब जमीनीची नोंद शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यावर ‘लागवडी योग्य क्षेत्र’ अशी नोंद होणार आहे. त्यादृष्टीने जिल्हा महसूल प्रशासनाने स्थानिक प्रशासनाला आदेश दिले आहेत. त्यानुसार जामखेड महसुल विभागाने जामखेड तालुक्यातील 466 गटांचे प्राथमिक सर्वेक्षण पुर्ण केले आहे. पुढील कार्यवाही सुरू असुन लवकरच ती पुर्ण होईल अशी माहिती तहसिलदार विशाल नाईकवाडे यांनी दिली. (Good news for farmers:Sub-poor area will be ‘cultivable area’ Note: Implementation will start from this date)

शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने आपल्या जवळील आर्थिक पदरमोड करून पोटखराब असलेल्या क्षेत्रामध्ये सुधारणा केली ते क्षेत्र लागवडीखाली आणले पण या पोटखराब क्षेत्राची सातबारा उताऱ्यावर ‘पोटखराब क्षेत्र’ अशीच नोंद राहिली आहे.याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसत असायचा. या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी एक नवीन आदेश पारीत केला आहे. पोटखराब क्षेत्राबाबत कालबद्ध कार्यपद्धती निश्चित केली आहे.ज्या शेतकऱ्यांनी असे पोटखराब क्षेत्र लागवडी योग्य केले आहे अशा शेतकऱ्यांनी स्थानिक तलाठ्याकडे अर्ज करावयाचा आहे. पोटखराब क्षेत्राच्या पिकपाण्याचा सर्व्हे तेथील स्थानिक तलाठी व भुमी अभिलेख विभाग करणार असुन याबाबत अंतिम निर्णय प्रांताधिकारी घेणार आहेत. प्रांताधिकारी यांनी त्यांच्या स्तरावरून अधिक काटेकोरपणे या कार्यपद्धतीची अंमलबजावणी करून त्याबाबतचे अहवाल हे वेळोवेळी जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करायचे आहेत.

मार्चच्या अखेरीसच पोटखराब जमिनीचा महाराष्ट्र जमीन महसूल कायद्यांतर्गत ‘लागवडी योग्य क्षेत्रा’त सामावेश करण्यात येणार आहे.तशा सुचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी तालुका निहाय महसुल यंत्रणेला दिल्या आहेत. पोटखराबचा हा प्रश्न सुटल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.(Good news for farmers:Sub-poor area will be ‘cultivable area’ Note: Implementation will start from this date)

कर्जत – जामखेड  मतदारसंघातील शेतकऱ्यांचे विविध प्रश्न समजुन घेत असताना आ.रोहित पवारांनी रखडलेल्या विम्याचा प्रश्न हाती घेतला आणि संपुर्ण जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे तब्बल १९० कोटी रु.मिळवून दिले.आता पोटखराब क्षेत्रात बदल होऊन त्या क्षेत्राची ‘लागवडी योग्य’ अशी नोंद व्हावी यासाठी रोहित पवारांनी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व जिल्हाधिकारी अहमदनगर यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्यास यश आल्याने याचा फायदा संपुर्ण जिल्ह्याला होणार आहे.