जामखेड टाइम्स वृत्तसेवा । जामखेड तालुक्यातील शिऊर, राजुरी आणि रत्नापुर ग्रामपंचायत निवडणुकीत यंदा थेट जनतेतून सरपंच शपदाची निवडणूक होत आहे. तीनही ग्रामपंचायतीमध्ये सरपंचपदासाठी 23 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. यातील 13 जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत.आता तीन जागांसाठी 10 उमेदवार सरपंचपदासाठी निवडणूकीच्या मैदानात असणार आहेत. सरपंचपदासाठी राजुरीत तिरंगी, रत्नापूरात चौरंगी तर शिऊरमध्ये तिरंगी लढत रंगणार आहे.
जामखेड तालुक्यातील 3 ग्रामपंचायतमधील 27 सदस्यपदांच्या 27 जागांसाठी 130 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. यामध्ये 6 जणांचे अर्ज छाननीत बाद झाले होते. बुधवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी 67 जणांनी माघार घेतली. 27 पैकी दोन जागा बिनविरोध झाल्या आहेत.आता 25 जागांसाठी 55 उमेदवार सदस्यपदासाठी निवडणूकीच्या रिंगणात उतरले आहेत.
ग्रामपंचायत निहाय अंतिम उमेदवार संख्या खालील प्रमाणे
ग्रामपंचायत नाव : रत्नापूर
एकूण जागा : 10 (9 सदस्य +1 थेट
सरपंच)
सदस्यपदासाठी प्राप्त नमनिर्देशन संख्या : 49
अवैध झालेले : 03
माघार घेतलेले : 28
निवडणूक लढविणारे अंतिम उमेदवार : 18
सरपंच पदासाठी प्राप्त नामनिर्देशन संख्या : 6
अवैध झालेले : 00
माघार झालेले : 02
अंतिम उमेदवार : 04
ग्रामपंचायत नाव : राजुरी
एकूण जागा : 10 ( 9 सदस्य +1 थेट
सरपंच)
सदस्यपदासाठी प्राप्त नामनिर्देशन संख्या : 48
अवैध झालेले : 2
माघार झालेले : 23
निवडणूक लढविणारे अंतिम उमेदवार : 23
सरपंचपदासाठी प्राप्त नमनिर्देशन संख्या : 07
अवैध झालेले : 00
माघार झालेले : 04
अंतिम उमेदवार : 03
ग्रामपंचायत नाव : शिऊर
एकूण जागा : 10 (9 सदस्य +1 थेट
सरपंच)
सदस्यपदासाठी प्राप्त नामनिर्देशन संख्या : 33
अवैध झालेले : 01
माघार झालेले : 16
बिनविरोध झालेले : 2
निवडणूक लढविणारे अंतिम उमेदवार : 14
सरपंच पदासाठी प्राप्त नमनिर्देशन संख्या :10
अवैध झालेले : 01
माघार झालेले : 07
अंतिम उमेदवार : 03