ग्रामपंचायत निवडणुक (Grampanchayat Election) : अर्ज छाननीत कुणाचा झाला पत्ता कट ? पहा गावनिहाय आकडेवारी

जामखेड तालुक्यातील 49 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असुन उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत विक्रमी 1302 उमेदवारी अर्ज दाखल केले होते. शेवटच्या दिवशी उशिरापर्यंत ऑफलाईन अर्ज दाखल करण्यास निवडणुक आयोगाने (Election commission) परवानगी दिल्याने शेवटीच्या तब्बल 700 पेक्षा अधिक उमेदवारी अर्ज जामखेड (Jamkhed) तालुक्यातून  दाखल झाले होते. यामुळे अर्जाची ऑनलाईन प्रक्रिया पुर्ण करताना प्रशासनाला उशिर लागला. ऑनलाईन प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर प्रशासनाने एक जानेवारी रोजी सायंकाळी पात्र अपात्र उमेदवारांची यादी जाहीर केली.

ग्रामपंचायत निवडणुक (Grampanchayat Election) अपात्र ठरलेल्या उमेदवारांची संख्या कंसामध्ये

जामखेड तालुक्यातील 49 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी (Grampanchayat Election) दाखल झालेल्या उमेदवारी अर्जामध्ये अपात्र ठरलेल्या (Cut the address of the person whose application was scrutinized) उमेदवारांची संख्या कंसामध्ये खर्डा 94 (07), तरडगाव 22,सातेफळ 13 (01), जायभायवाडी 30, धामणगाव 30 (01),पिंपळगाव उंडा 14 (01), पिंपरखेड 57,धोंडपारगाव 14,राजेवाडी 10,आपटी 07,कवडगाव 30, नान्नज 44 (01),नायगाव 23,बांधखडक 24,देवदैठण 31(02),मोहा 42 (03),डोणगाव 28 (02),नाहूली 27,खांडवी 23 (02),बावी 17, सावरगाव 14,पिपळगाव आळवा 24,सारोळा 09,आनंदवाडी 16, बाळगव्हाण 14, लोणी 21,अरणगाव 52, वाकी 09, तेलंगशी 27 (01), जातेगाव 32 (01), धानोरा 31(05), वाघा 20, गुरेवाडी 14, पाटोदा 38 (12), मोहरी 17 (01), कुसडगाव 27 (01), झिक्री 15, आघी 18, चौंडी 42,घोडेगाव 35 (01),बोर्ले 23 (01), साकत 49, चोभेवाडी 18, पोतेवाडी 07, जवळके 21, खुरदैठण 07,पाडळी 22, सोनेगाव 16 (01), दिघोळ 40 असे उमेदवारी अर्ज राहिले आहेत. 04 जानेवारी रोजी किती जण अर्ज माघारी घेतात त्यानंतर जामखेड तालुक्यातील 49 गावांमधील निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल.

दाखल 1302 उमेदवारी अर्जांपैकी छाननीत 44 उमेदवारी अर्ज अपात्र ठरले आहेत. तर 1258 उमेदवारी अर्ज पात्र ठरले आहेत. निवडणुकीआधीच सारोळा, आपटी, खुरदैठण, पोतेवाडी व वाकी या ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. या ठिकाणी असलेल्या सदस्यांच्याच प्रमाणात उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. आमदार रोहित पवारांनी केलेल्या अवाहनानुसार या पाच ग्रामपंचायतींचा 30 लाखांच्या विकासनिधीवर दावा पक्का झाला आहे.