जामखेड टाईम्स वृत्तसेवा : जामखेड तालुक्यातील नायगाव आणि जवळा ग्रामपंचायत पोटनिवडणूकीत (voting Gram Panchayat by-election in Jamkhed taluka) आज २१ रोजी अतिशय चुरशीच्या वातावरणात मतदान पार पडले. मात्र कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. शांततेत मतदान संपन्न झाले.
जामखेड तालुक्यातील जवळा ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्रमांक ५ मधील सर्वसाधारण जागेसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीत दोन उमेदवारांमध्ये थेट सामना झाला तर नायगाव ग्रामपंचायतमधील प्रभाग क्रमांक ०१ मधील सर्वसाधारण जागेसाठी ०४ उमेदवारांमध्ये सामना झाला.
आज २१ रोजी पार पडलेल्या जवळा ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीत एकुण ७९.५४ टक्के मतदान झाले. प्रभाग ५ साठी ही पोटनिवडणूक झाली. यातून एकुण ९७३ मतदार होते यापैकी ७७४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये ३७८ महिला तर ३९६ पुरूषांनी मतदानाचा हक्क बजावला.
नायगाव ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत एकुण ८५.८८ टक्के मतदान झाले. प्रभाग ०१ मध्ये ही पोटनिवडणुक पार पडली. यासाठी एकूण ५०३ मतदार होते यापैकी ४३२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यात २११ महिला तर २२१ पुरूषांनी मतदारांनी मतदान केले.
नायगाव व जवळा या दोन्ही ठिकाणी झालेल्या पोटनिवडणुकीत एकुण ८१.७० टक्के मतदान झाले. यात एकुण १४७६ मतदार होते. यामध्ये १२०६ मतदारांनी मतदान केले. यात ५८९ महिला मतदारांनी तर ६१७ पुरूष मतदारांनी मतदान केले.
जामखेड तालुक्यात आज २१ रोजी पार पडलेल्या पोटनिवडणुकीसाठीचे मतदान शांततेत पार पडले. तहसीलदार योगेश चंद्रे आणि पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाने चोख व्यवस्था ठेवली होती. कुठेही अनुसूचित प्रकार घडला नाही.
दरम्यान नायगाव पोटनिवडणुकीसाठी मंडळ अधिकारी माने यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले तर जवळा पोटनिवडणुकीसाठी रोजगार हमी योजनेचे अव्वल कारकून गायकवाड यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले.
सावरगाव आणि आघी बिनविरोध
सावरगाव ग्रामपंचायतमधील प्रभाग १ मधील अनुसूचित जातीच्या एका जागेसाठी होणाऱ्या निवडणूकीसाठी योगेश दत्तात्रय वाघमारे यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता. तर आघी येथील प्रभाग ३ मधील अनुसूचित जाती स्त्री या जागेसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी साधना कल्याण शिंदे यांचा एकमेव अर्ज आला होता. त्यामुळ आघी व सावरगाव येथील निवडणुका यापुर्वीच बिनविरोध झाल्या आहेत.
voting Gram Panchayat by-election in Jamkhed taluka