Karjat Jamkhed News : ऐन दिवाळी राजकीय भूकंप, रोहित पवारांची साथ सोडत ५० प्रभावशाली युवकांचा भाजपात प्रवेश, डोणगावमध्ये राष्ट्रवादीला पडले मोठे भगदाड !
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्जत जामखेड मतदारसंघात मोठ्या राजकीय उलथापालथी होताना दिसत आहेत. मंगळवारी मध्यरात्री जामखेड तालुक्यातील डोणगावमध्ये मोठा राजकीय भूकंप झाला. रोहित पवारांच्या मनमानी व हुकुमशाही कारभाराला कंटाळून डोणगावमधील ५० युवकांनी आमदार प्रा.राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला. ऐन दिवाळीत डोणगावमध्ये मोठा राजकीय धमाका झाल्याने राष्ट्रवादीला मोठे भगदाड पडले आहे.
मागील निवडणुकीत दिलेल्या अश्वासनांची पुर्तता करण्यात रोहित पवारांना पुरते अपयश आले. मागील पाच वर्षांत दडपशाही, हुकुमशाहीचे राजकारण करत मनमानी कारभार केल्यामुळे मतदारसंघातील युवकांमध्ये रोहित पवारांविरोधात मोठी लाट निर्माण झाली आहे. कर्जत जामखेड मतदारसंघात यंदा ‘आपल्या मातीतला आपलाच भूमिपुत्र आमदार’ अशी भूमिका घेऊन जनतेने विधानसभेची निवडणूक हातात घेतल्याचे दिसू लागले आहे.
डोणगावमध्ये राजकीय भूकंप !
कर्जत-जामखेडच्या स्वाभिमान आणि अभिमानासाठी स्वाभिमानी जनता रोहित पवारांविरोधात एकवटली आहे. ‘आपला तो आपलाच’ म्हणत गावागावातून आमदार राम शिंदे यांना युवक व जनतेचा प्रचंड पाठिंबा वाढू लागला आहे, याचाच प्रत्यय मंगळवारी मध्यरात्री दिसून आला. जामखेड तालुक्यातील डोणगावमधील ५० प्रभावशाली जनाधार असलेल्या युवकांनी रोहित पवारांची साथ सोडण्याचा मोठा निर्णय घेत भाजपात प्रवेश केला.
यावेळी जामखेड बाजार समितीचे संचालक सचिन घुमरे, पांडुरंग उबाळे, संजय काका काशिद, नगरसेवक अनिल गदादे, शिवसेना कर्जत जामखेड विधानसभा प्रमुख दिपक जंजिरे, लहू शिंदे, महारूद्र महारनवर, सुनिल यादव, संतोष गव्हाळे, माजी सरपंच दत्तात्रय भागवत, माजी उपसरपंच अजित यादव, राम पवळ, रामेश्वर यादव मेजर, पोपट जमदाडे, प्रशांत साळवान, डाॅ गणेश यादव, वैभव यादव, युवराज धनवे, बाळासाहेब पवळ, सुजित धनवे, सह आदी पदाधिकारी उपस्थित होते.
डोणगावमधील ५० युवकांचा भाजपात प्रवेश
आमदार प्रा.राम शिंदे यांनी आमदार व मंत्री असताना केलेल्या कामांवर प्रभावित होऊन तसेच कर्जत जामखेडच्या स्वाभिमान आणि अभिमानाच्या लढ्याला बळ देण्यासाठी डोणगावमधील युवकांनी आमदार राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भाजपात जाहीर प्रवेश केला. हा पक्ष प्रवेश सोहळा आमदार शिंदे यांच्या चोंडी येथील निवासस्थानी पार पडला.
यावेळी डोणगावमधील सतीश डोंगरे, पांडुरंग पोठरे, मनोज यादव, प्रकाश वारे, राम पोठरे, सचिन पोठरे, देवा मोरे, बारकु धनवे, सचिन सातव, संदीप सातव, प्रकाश यादव, तुषार मुळे, निलेश वारे, सतीश मोरे, हनुमंत मोरे, सुमित धनवे, अमोल उघडे, रामेश्वर यादव, युवराज धनवे, हनुमंत मोरे, सागर मोरे, हनुमंत यादव, नवनाथ भागवत, खंडू मोरे, तात्यासाहेब यादव, गणेश यादव, हनुमंत हौसराव यादव,गहिनीनाथ मुळे, शरद साळवान, अशोक यादव, तुषार यादव, ओम सुतार, शंकर यादव, गणेश नन्नवरे, सुरेश वाघमारे, सुशांत सातव, आकाश यादव, मुन्ना मोरे, सागर मोरे या युवकांनी आमदार प्रा.राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भाजपामध्ये जाहीर प्रवेश केला. डोणगावमधील युवकांनी घेतलेल्या या राजकीय निर्णयामुळे राष्ट्रवादीला डोणगावमध्ये मोठे भगदाड पडले आहे.